Bigg Boss 14: सलमान खानचा शो बिग बॉस 14 मध्ये होणार 'Radhe Maa' ची एन्ट्री; समोर आला नवा प्रोमो (Watch Video)
Radhe Maa enters Bigg Boss 14 (Photo Credits: Instagram)

टीव्ही जगतामधील लोकप्रिय शो बिग बॉस (Bigg Boss) पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस 14 (Bigg Boss 14) बाबतचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. बिग बॉसचा मागचा सिझन जसा लोकप्रिय ठरला होता तसाच यंदाही तो लोकप्रिय ठरावा, म्हणून मेकर्सनी चंग बांधला आहे. यासाठी स्पर्धकांची निवड फार महत्वाची भूमिका बजावणार आहे. आता एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राधे माँ (Radhe Maa) बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना दिसत आहे. कलर्सने ट्वीटरवर याचा प्रोमो शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये बिग बॉस 14 च्या घरात राधे माँ प्रवेश करताना दिसत आहे. एवढेच नाही तर बिग बॉस 14 च्या यशासाठी तिने प्रार्थनाही केली आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच राधे माँ म्हणते, ‘हे घर नेहमीच असे जोडले राहू दे, यंदाचा बिग बॉस यशस्वी होऊ दे.’ व्हिडिओमध्ये राधे माँ तिच्या नेहमीच्या लाल रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. बिग बॉस 14 चा हा प्रोमो व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वीच बातम्या आल्या होत्या की, राधे माँ घरामध्ये येणार आहे. त्याला आता पुष्टी मिळाली आहे.

पहा व्हिडिओ -

राधे माँचे खरे नाव सुखविंदर कौर असे आहे. ‘राधे माँ’ ही एक अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखली जाते. सुखविंदर कौर म्हणजेच राधे मां स्वत: ला आई दुर्गाचे रूप मानते. याआधी कसीनोमध्ये केलेला डान्स असो वा डॉली बिंद्रासोबतचा वाद असो, अनेकवेळा ‘राधे माँ’ विविध कारणांनी चर्चेमध्ये आली आहे. (हेही वाचा: 'बिग बॉस 14' मध्ये येण्याआधीच स्पर्धक गोपी बहु म्हणजेच Giaa Manek ला निर्मात्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता, त्याऐवजी दिसणार 'हे' दोन सेलेब्ज; जाणून घ्या काय आहे कारण)

दरम्यान, सलमान खान 1 ऑक्टोबर 2020 रोजी प्रीमियर नाईट एपिसोडचे शूटिंग करेल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक वर्षी प्रीमियर नाईटच्या 1 दिवस आधी त्याचे शुटींग होत असे, मात्र आता सध्याचा काळ पाहता यामध्ये बदल केला गेला आहे.