Bigg Boss 13 : पारस छाब्रा च्या गर्लफ्रेंडने लीक केले पर्सनल चॅट? पाहा हे फोटो
Paras Chhabra and Akanksha Puri (Photo Credits: Instagram)

A new problem for Paras Chhabra? Bigg Boss 13 या सर्वात कॉंट्रोव्हर्शिअल शोमध्ये सध्या सुरु असलेल्या भांडणामुळे अनेक स्पर्धक सध्या चर्चेत आहेत. शेहनाज, सिद्धार्थ, रश्मी, पारस ही नावं सध्या बिग बॉस फॅन्समध्ये चर्चेचा हॉट टॉपिक बनली आहेत. त्यात सलमान खानने रश्मी देसाईसमोर अरहानची पोल खोल तर केलीच पण त्याचसोबत रश्मीचा प्रेमभंग केल्यामुळे सलमानने त्याला धडासुद्धा शिकवला. हे सर्व घडत असतानाच पारस छाब्रा हा देखील नव्या अडचणीत अडकला आहे. पारसची पोल खोल केली आहे चक्क त्याच्या रिअल लाईफ गर्लफ्रेंड ने.

पारसच्या बिग बॉसच्या घरातील वागणुकीमुळे त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी (Paras Chhabra's girlfriend Akanksha Puri) त्याच्यावर खूप नाराज आहे. अरहान खानने जेव्हा घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत प्रवेश केला तेव्हा त्याने पारसला सांगितले की त्याची गर्लफ्रेंड त्याला खूप सपोर्ट करत आहे. पण त्यावर पारस म्हणाला, मी तिला असं करण्यास अजिबात सांगितलेलं नाही. इतकंच नव्हे तर अरहानने त्याला जेव्हा आकांक्षाच्या नावाच्या टॅटूबद्दल विचारलं, तेव्हा पारस त्याला म्हणाला की त्याला हा टॅटू आकांक्षाच्या सांगण्यावरून जबरदस्तीनं काढावा लागला होता. हे सर्व ऐकून आकांक्षाने पारसची पोल खोल करायची ठरवली आहे.

नुकतेच बिग बॉस खबरी नावाच्या एका बिग बॉस फॅन पेजवरुन पारस आणि आकांक्षाचे पर्सनल चॅट शेअर करण्यात आले आहेत. आणि आता असे म्हटले जात आहे की हे सर्व चॅट स्वतः आकाक्षानं लीक केले आहेत. या चॅटमध्ये आपल्याला दोघांमधील रोमँटिक गप्पा पाहायला मिळतात तसेच, आकांक्षाला पारस समजावताना दिसत आहे की तिनं फार इमोशनल होऊ नये कारण तो तिच्यासोबत प्रामाणिक राहिल.

Bigg Boss 13: पाहा रश्मी देसाई काय म्हणाली तिच्या Marriage Plans विषयी

हे चॅट पारस आणि आकांक्षाचेच आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी आकांक्षाने काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिची बाजू स्पष्ट केली आहे. पारसच्या बिग बॉस मधील वागण्यामुळे ती किती दुखावली गेली आहे हे तिने सांगितलं होतंच पण त्याचसोबत पारसने तिची माफी मागावी अशी देखील तिची मागणी होती.