Rashami Desai Talks About Her Marriage Plans: Bigg Boss 13 मध्ये अरहान खानने (Arhaan Khan) घेतलेल्या एन्ट्रीमुळे रश्मी देसाईने (Rashami Desai) अखेर सुटकेचा श्वास घेतला आहे. शोमध्ये, अरहानने पुन्हा प्रवेश घेतलाच पण त्याहीसोबत घरात एंटर करताच रश्मीला प्रपोज केले. रश्मीनेही तिचे अरहानसमोर आपले प्रेम व्यक्त केले. त्यामुळे आता बिग बॉसमध्ये या दोघांची केमिस्ट्री आणखी रंगात आणेल असं म्हणायला हरकत नाही. इतकंच नव्हे तर रश्मीने नुकतेच बिग बॉसच्या घरात तिच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल सांगितले आहे.
काय म्हणाली रश्मी तिच्या Marriage Plans विषयी?
शोमध्ये आरती रश्मीला तिच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल विचारते आणि म्हणते की उन्हाळ्यात लग्न करू नका. हे ऐकून रश्मी लाजायला सुरुवात करते. रश्मी आरतीला सांगितलं की, "फेब्रुवारी पर्यंत तरी आम्ही बिग बॉसच्या घरात असणार आहोत. त्यामुळे इथून बाहेर पडल्यावरच आम्ही लग्नाचा विचार करू. आम्ही आता फक्त एकमेकांबद्दलची फीलिंग्स शेअर केल्या आहेत."
रश्मी आरतीला असंही म्हणाली की अरहानने माझ्यासाठी आणलेली अंगठी त्याच्या बहिणीने डिझाइन केली होती.
Bigg Boss 13 च्या मंचावर अनन्या पांडे ची जीभ घसरली; पाहा काय म्हणाली या व्हिडिओमध्ये (Watch Video)
दरम्यान, अरहान खानने नुकतेच बिग बॉसच्या घरात पुन्हा प्रवेश घेतला आहे. घरात एन्ट्री घेताना रश्मीसाठी त्याने एक रिंग आणली होती. परंतु, रसक्षमीने ती अंगठी घातली नव्हती. खरं तर, जेव्हा अरहानने सर्व कॅन्टेस्टंट्स समोर रश्मीला प्रपोझ केलं, तेव्हा रश्मी वारंवार म्हणत होती की तिला कसं रिऍक्ट करावं हे कळत नाही.