सिद्धार्थ शुक्ल विरुद्ध सिद्धार्थ डे असा सामना रंगात असता, सिद्धार्थ शुक्ल ठरला विजयी. आणि अशा प्रकारे तो नॉमिनेशन मधूनही सुरक्षित झाला 

नॉमिनेशन टास्कमध्ये रश्मीने केलं सिद्धार्थ शुक्लला टार्गेट आणि प्रयत्न केला त्याला नॉमिनेट करण्याचा. किचन पॉलिटिक्सला रश्मी टास्कमध्ये पण आणू पाहतेय का?

पारस आणि शेहनाजमध्ये फूट पडताना दिसत आहे तर पारसने टास्कच्या वेळी दलजितला तिच्या मुलाची दिली शपथ.

टास्कचा बझर वाजताच सिद्धार्थने केला माहिरावर शब्दांनी हल्ला. त्यानंतर सिद्धार्थ शुक्ल विरुद्ध सिद्धार्थ डे असा रंगात आहे सामना. बघूया कोण जिंकेल दोघांमधून

नॉमिनेशनच्या या टास्कमध्ये सगळ्यांनीच कसून प्लॅनिंग केलं. कोयनाने शेहनाजला समजावलं तर रश्मी आणि शेफालीने Siddharth Dey ला वाचवायचं ठरवलंय. पाहूया काय होतंय...

सुरु झालाय नॉमिनेशनचा टास्क. आज होणार मुलांचं नॉमिनेशन. कोणाचा मासा वाचेल आणि कोणाचा अडलेक जाळ्यात ते कळेल थोड्याच वेळात. पण इतकं नक्की कि मुलींच्या हातात असेल मुलांचं नशीब.

Bigg Boss 13 चं घर विभागलं गेलंय दोन ग्रुप्स मध्ये. एक आहे Siddharth Shukla चा ग्रुप तर विरुद्ध आहे Paras Chhabra चा ग्रुप. कोणता सदस्य कोणाला देईल साथ ते कळेल थोड्याच वेळात.

Bigg Boss 13 च्या कालच्या भागात Paras Chhabra होता सगळ्यांच्या हिट लिस्टवर. घरातील भांडणं तर वाढत गेलीच पण त्यासोबतच गैरसमजही निर्माण झाले.

आजच्या भागात हीच भांडणं पडतील का मुलांना महागात? कारण आज होणार आहे मुलांचा नॉमिनेशन. मुलांचं नशीब आहे मुलींच्या हातात कारण त्याच ठरवू शकतात कोणाला करायचं सेफ आणि कोणाला करायचं नॉमिनेट

आजच्या भागातील LIVE UPDATES साठी इथे वाचत राहा