Bigg Boss 13: लव्हबर्ड्स असीम रियाज आणि हिमांशी खुराना लवकरच झळकणार  म्युझिक व्हिडिओमध्ये
Asim Riaz, Himanshi Khurana (Photo Credits: Instagram)

बिग बॉस 13 (Bigg Boss 13) हा शो टीव्हीच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम ठरला. त्यामुळे निर्मात्याने या कार्यक्रमाचा अवधी दीड महिना वाढवला. बिग बॉस 13 कार्यक्रम संपवून दोन आठवडे झाले आहेत. मात्र, या शोच्या स्पर्धकांविषयीच्या बातम्या काही थांबवण्याच नाव घेत नाहीत. प्राप्त माहितीनुसार लव्हबर्ड्स असीम रियाज (Asim Riaz) आणि हिमांशी खुराना (Himanshi Khurana) लवकरच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देणार आहेत. हे खास सरप्राईज म्हणजे असीम रियाज आणि हिमांशी एका म्युझिक व्हिडिओ (Music Video) फ्रेममध्ये एकत्र झळकणार आहेत.

हिमाशीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर आसीम रियाजही पाहायला मिळत आहे. हे पोस्टर शेअर करताना हिमांशीने आपल्या चाहत्यांना काहीतरी स्पेशल सरप्राईज देणार असल्याच म्हटलंय. हिमांशी आणि असीम गायिका नेहा कक्कड यांच्या एका म्यूझिक व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. हे गाणं 18 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरवर हिमांशी आणि असीमची जोडी खूपच हटके दिसत आहे. मात्र, प्रेक्षक आता या दोघांना नेहा कक्कडच्या आवाजातील गाण्यात एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत. (हेही वाचा - अक्षय कुमार, अजय देवगन सह कलाकारांची Nirbhaya Gangrape Case प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी)

दरम्यान, आसीम आणि हिमांशीची ओळख बिग बॉसच्या घरात झाली होती. या दोघांमध्ये जवळीकता वाढली आणि याचे रुपांतर प्रेमात झाले. असीमने हिमांशीला अगदी गुडघ्यावर बसून लग्नासाठी प्रपोज केलं होतं. तसेच हिमांशी आणि असीम नेहमी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. यावरून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच दिसतं.

टक्कल असणाऱ्या व्यक्तींसाठी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर शेअर केल 'हे' भावनिक गाण Watch Video 

याव्यतिरिक्त असीम रियाज बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या सोबत एका होळी व्हिडिओमध्ये दिसणार आहे.