अक्षय कुमार, अजय देवगन सह कलाकारांची Nirbhaya Gangrape Case प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी
Ajay Devgn & Akshay Kumar (Photo Credits: Yogen Shah)

रोहित शेट्टी (Rohit Shetty) चा मल्टीस्टारर सिनेमा 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा काल (2 मार्च) मुंबईत पार पडला. या सोहळ्यात अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगन (Ajay Devgn), रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे सिनेमातील कलाकार उपस्थित होते. यावेळी त्यांनी मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळेस एका पत्रकाराने निर्भया गँगरेप प्रकरणावर प्रश्न छेडला असता कलाकारांनी दोषींना फाशी देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर मीडियाशी बोलताना अभिनेता अजय देवगन म्हणाला की, "अशा गुन्हात 100% फाशी व्हायला हवी." तर रोहित शेट्टीने देखील यावर बोलताना सांगितले की, "नक्कीच, या दोषींना शिक्षा व्हायला हवी."

अभिनेता अक्षय कुमार याला देखील हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, "यात कोणतीच शंका नाही. दोषींना फाशी देण्यात यावी, यावर आम्ही सर्वच सहमत आहोत." यावेळेस मंचावर कतरिना कैफ आणि करण जोहर देखील उपस्थित होते. पहा सिनेमाचा ट्रेलर

विशेष म्हणजे दिल्लीच्या पाटियाला हाऊस कोर्टाने निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषींविरोधात नवे डेथ वॉरंट जारी केले होते. मात्र काल झालेल्या सुनावणीत त्यास स्थगिती मिळाली आहे. निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषींना यापूर्वी दोनदा फाशीची शिक्षा लांबणीवर पडली होती. आता पुन्हा यास स्थगिती मिळाली आहे.

बहुचर्चित आणि मस्टीस्टारर असा रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' सिनेमा 27 मार्च 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.