Sooryavanshi Trailer: अक्षय कुमार, अजय देवगन आणि रणवीर सिंह स्टारर अॅक्शन्स ने भरपूर असलेला 'सूर्यवंशी' सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित; Watch Video
अक्षय कुमार सह चित्रपटाच्या अन्य कलाकारांनीही आपल्या सोशल अकाउंटवरुन हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. इतकच नव्हे तर अक्षयने हा ट्रेलर पोस्ट करत त्याखाली "डीसीपी वीर सूर्यवंशी रिपोर्टिंग लाइव." असे लिहिले आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलर मध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar), रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अजय देवगन (Ajay Devgan) यांच्या दमदार अॅक्शन सीन्स आणि डायलॉग्सने ट्रेलरला चार चांद लावले आहेत. कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिसांची कहानी या चित्रपटातून दाखविण्यात आली असल्याचे या ट्रेलरमधून कळतय. आज चित्रपट निर्मात्यांनी या ट्रेलर इंटरनेटवर प्रदर्शित केला आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात 'सिंघम' आणि 'सिम्बा' या दोघांचीही झलक पाहायला मिळणार आहे.
अक्षय कुमार सह चित्रपटाच्या अन्य कलाकारांनीही आपल्या सोशल अकाउंटवरुन हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. इतकच नव्हे तर अक्षयने हा ट्रेलर पोस्ट करत त्याखाली "डीसीपी वीर सूर्यवंशी रिपोर्टिंग लाइव." असे लिहिले आहे.
पाहा ट्रेलर:
हा धडाकेबाज ट्रेलर पाहून यात प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शनसीन्स, अक्कीचे खतरनाक स्ट्ंस पाहायला मिळणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. या चित्रपटात अक्षय कुमार शिवाय गुलशन ग्रोवर, अभिमन्यु दासानी, जॅकी श्रॉफ आणि सिकंदर खेर सुद्धा दिसतील. हा चित्रपट येत्या 24 मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Akshay Kumar च्या Sooryavanshi सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉंन्च Watch Video
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार याने यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत लिहिले होते की, "आता गुन्हा होणार नाही कारण पोलिस येत आहेत. सूर्यवंशी 24 मार्चला प्रदर्शित होणार आहे."
(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2020 02:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

