Sooryavanshi: अक्षय कुमार याने खास व्हिडिओ शेअर करत जाहीर केली  'सूर्यवंशी' सिनेमाची रिलीज डेट; या दिवशी ट्रेलर होणार आऊट (Watch Video)
Sooryavanshi (Photo Credits: YouTube Stills)

रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित सूर्यवंशी (Sooryavanshi) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या या सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) ही जोडी खूप काळानंतर एकत्र झळकणार आहे. या सिनेमाची उत्सुकता अधिक ताणून न धरता प्रदर्शनाची तारिख जाहीर करण्यात आली आहे. अक्षय कुमारने ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत ही गुड न्यूज सर्वांना दिली आहे. 'सूर्यवंशी' सिनेमातील अक्षय कुमार याचा पोलिस अवतारातील दमदार फर्स्ट लूक! (Photo)

अक्षय कुमार याने एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत लिहिले की, "आता गुन्हा होणार नाही कारण पोलिस येत आहेत. सूर्यवंशी 24 मार्चला प्रदर्शित होणार आहे." ('सूर्यवंशी' चित्रपटात 'अक्षय-कतरिना' ची जोडी 9 वर्षांनी पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र)

अक्षय कुमार ट्विट:

या सिनेमाचा ट्रेलर 2 मार्च 2020 रोजी रिलिज होईल. या सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगन आणि रणवीर सिंह हे स्टार प्रथमच एकत्र येणार असून त्यांना स्क्रीनवर एकत्र पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी अजय देवगन रोहित शेट्टीच्या 'सिंघम,' 'सिंघम रिटर्न्स' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर 2018 मध्ये आलेल्या रणवीर सिंहच्या 'सिम्बा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धूमाकुळ घातला होता. त्यानंतर आता अक्षय कुमार 'सूर्यवंशी म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.