कित्येक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटातील 'लिडिंग लेडी' म्हणून कतरीना कैफ (Katrina Kaif) च्या नावाची घोषणा चित्रपटाच्या टीम तर्फे करण्यात आली. या निमित्ताने बॉलीवूड चा 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) व कतरीना कैफ ही जोडी तब्बल 9 वर्षाने एकत्र येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित या फिल्मचे पोस्टर शूट नुकतेच पार पडले.
काही दिवसांपूर्वी आलेल्या सिम्बा (Simmba) मध्ये सूर्यवंशीची पहिली झलक पाहिल्यापासून या सिनेमाच्या स्टार कास्ट बद्दल बॉलीवूड प्रेमींमध्ये चर्चा सुरु होत्या. मात्र चित्रपटाचा निर्माता करण जोहर (Karan Johar) याने नुकतंच सूर्यवंशी गर्ल म्हणून घोषित केलेल्या कतरीना कैफच्या नावाने या सर्व चर्चांना विराम लागला आहे. Sooryavanshi First Look: 'सूर्यवंशी' सिनेमातील अक्षय कुमार याचा पोलिस अवतारातील दमदार फर्स्ट लूक! (Photo)
या सोबतच अक्षय कुमारने देखील "कॉप युनिव्हर्स मध्ये तुझं स्वागत आहे", असं म्हणत सूर्यवंशी गर्ल कतरीना,दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि निर्माता करण जोहर सोबतच एका फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अक्षय कुमार ट्विट:
Welcome to our COP UNIVERSE #KatrinaKaif...OUR SOORYAVANSHI GIRL#RohitShetty @karanjohar @RelianceEnt @RSPicturez @DharmaMovies #CapeOfGoodFilms pic.twitter.com/LCarnkVpwp
— Akshay Kumar (@akshaykumar) April 22, 2019
करण जोहर ट्विट:
Here’s welcoming our #Sooryavanshi girl #KatrinaKaif to the cop universe!👮♀️
Releasing on Eid 2020! @akshaykumar #RohitShetty #HirooYashJohar #ArunaBhatia @karanjohar @apoorvamehta18 @RelianceEnt @RSPicturez #CapeOfGoodFilms pic.twitter.com/KxfIMz7jAL
— Dharma Productions (@DharmaMovies) April 22, 2019
करण जोहरने केलेल्या एका ट्विट नुसार, यावर्षी मे नंतर या सिनेमाचं शूट सुरु होणार असून २०२० च्या ईदला ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जातेय.
यापूर्वी अक्षय आणि कतरिनाच्या जोडीनं 'हमको दीवाना कर गए', 'नमस्ते लंडन', 'तीस मार खान', 'दे दना दन', 'सिंग इज किंग' आणि 'वेलकम' यासारख्या हिट चित्रपटांमधून आपली केमिस्ट्री चाहत्यांना दाखवली होती. आणि आता सूर्यवंशीच्या निमित्ताने 9 वर्षाने एकत्र आलेल्या या जोडीची जादू बॉक्स ऑफिसवर काय धमाल करतेय हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.