Sooryavanshi First Look: 'सूर्यवंशी' सिनेमातील अक्षय कुमार याचा पोलिस अवतारातील दमदार फर्स्ट लूक! (Photo)
Movie Poster of Sooryavanshi (Photo Credits: Instagram)

अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या आपल्या केसरी (Kesari) सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्यातच 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'सिंघम', 'सिम्बा' या सुपरहिट सिनेमांनंतर रोहित शेट्टी (Rohit Shetty) 'सूर्यवंशी' हा नवा कोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील पोलिस अवतारातील अक्षय कुमारचा दमदार लूक समोर आला आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रॉडक्शन्सअंतर्गत होत आहे.

करण जोहरने अक्षय कुमारचा हा फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर करत लिहिले की, "ईद 2020 मध्ये गोळीच्या बदल्यात गोळी मिळेल. सूर्यवंशी स्टार अक्षय कुमार खिलाडी आहे आणि या सिनेमाचे दिग्दर्शन ब्लॉकबस्टर मशीन रोहित शेट्टी करत आहे."

पोस्टरवर अक्षय कुमार पोलिस अधिकाऱ्याच्या वेशात दमदार अंदाजात पाहायला मिळत आहे.

WhatsApp-Image-2019-03-04-at-7.36.00-PM

'सूर्यवंशी' सिनेमातील 'अक्षय कुमार'ची पहिली झलक | (Photo Credits: File Photo)

सिनेमातील अक्षय कुमारचा पहिली झलक पाहताना त्यात 'सिंघम', 'सिम्बा' स्टाईल काहीतरी हटके असणार यात वाद नाही.