Bigg Boss 13: हिंदुस्तानी भाऊची पत्नी पोहोचली पोलीस स्टेशन मध्ये; जाणून घ्या त्या मागचं कारण
Hindustani Bhau (Photo Credits: YouTube)

बिग बॉस 13 या शोमधील रंगत दिवसागणिक वाढताना दिसतेय. सुरुवातीच्या काही आठवड्यात कंटाळवाणा वाटणारा हा सीझन आता मात्र तितकाच चर्चेचा विषय ठरला आहे. शोमध्ये हिंदुस्तनी भाऊ या स्पर्धकाची जेव्हापासून वाइल्ड कार्डद्वारे घरात एंट्री झाली आहे तेव्हापासून शोचा चाहता प्रेक्षक वर्ग देखील वाढला आहे.

हिंदुस्तनी भाऊ अर्थात विकास फाटक त्याच्या बिग बॉसच्या घरातील वागणुकीमुळे सोशल मीडियावर खूपच चर्चेत दिसून येत आहे. त्याचं निराळा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेच पण त्याहीसोबत त्याचं फॅनवर्गसुद्धा वाढताना दिसतोय. अशा परिस्थिती हिंदुस्तनी भाऊच्या बायकोला मात्र पोलीस स्टेशनला जावे लागले आहे.

बिग बॉसच्या घरात हिंदुस्तनी भाऊचं सलमान खानकडून कौतुक होत असला तरी त्याच्या बायकोला म्हणजेच अश्विनी फाटक यांना मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

बोगस तेल विक्री जाहिरात केल्या प्रकरणी गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांना न्यायालयाने ठोठावला दंड; वाचा सविस्तर

तिने पोलीस स्टेशनला जाण्याचे कारण म्हणजे हिंदुस्तानी भाऊचे खोटे नातेवाईक. भाऊचे नातेवाईक म्हणून रोज नव्या लोकांची नावं समोर येत दिसत असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं आहे आणि म्हणूनच 24 नोव्हेंबर रोजी अश्विनीने जाऊन थेट पोलिसात तक्रार केली आहे. या तक्रारीत तिने, "आमच्या कुटुंबात माझी सासू, मुलगा, माझे आई-वडील आणि हिंदुस्तानी भाऊचा भाचा एवढेच लोक आहेत," असं स्पष्टपणे नमूद केलं आहे. तसेच अनेक लोक स्वतःला हिंदुस्तानी भाऊचे काका किंवा भाऊ असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा तिने या पात्रात दिला आहे.