बॉलीवूड अभिनेते गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांना खोट्या जाहिरात्रीसाठी न्यायालयाने दंड थोटवला आहे. उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगर येथील ग्राहक न्यायालयाने हा दंड थोटवला असून त्यांना २० हजार रुपये या दोन्ही अभिनेत्यांना दंडाची रूपात म्हणून भरावे लागणार आहे. वेदनक्षमक तेलाच्या खोट्या जाहिरातीसाठी हा दंड त्यांना भरावा लागणार आहे. इतकंच नव्हे तर हे तेल बनवणाऱ्या कंपनीला ही दंड भरावा लागणार आहे.
एका व्यक्तिने हर्बल तेल उत्पादक कंपनी आणि त्या तेलाचे ब्रँड अॅम्बेसेडर गोविंदा व जॅकी यांच्याविरोधात पाच वर्षांपूर्वी न्यायालयात खटला दाखल केला होता.
वृत्तपत्रातील आलेली जाहिरात वाचून अभिनव अग्रवाल यांनी 2012 साली आपल्या 70 वर्षीय वडिलांसाठी हर्बल तेल खरेदी केले होते. आणि या तेलाची किंमत तेव्हा 3,600 रुपये इतकी होती.
मुख्य म्हणजे या तेलाच्या जाहिरातीत गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांनी म्हटल्यानुसार, या तेलाचा नियमित वापर केल्यास केवळ 15 दिवसांत शरीरातील सर्व वेदना पळून जातात आणि जर वेदना कमी झाल्याच नाहीत, तर कंपनी 15 दिवसांत तुम्हाला तुमचे पैसे परत करणार.
परंतु या तेलाचा काहीचं उपयोग झाला नाही व हा दावा साफ खोटा ठरला. आणि म्हणूनच अभिनय यांनी कंपनीकडे त्यांचे पैसे परत करण्याची विनंती केली. परंतु NDTV इंडिया या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार तेल कंपनीने अभिनव यांनी पैसे परत करण्यासाठी नकार दिला.
Yash Raj Films वर तब्बल 100 कोटीचा फसवणुकीचा गुन्हा दाखल; कलाकारांची रॉयल्टी हडपण्याचा आरोप
अखेर अभिनव यांनी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत या प्रकरणी न्यायालयाकडे तक्रार केली. आणि शेवटी न्यायालयाने अभिनव यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर तेल कंपनी, गोविंदा, जॅकी श्रॉफ, टेलीमार्ट शॉपिंग नेटवर्क प्राइवेट लिमिटेड कंपनी या चौघांनाही दोषी ठरवले आहे.