Khatron Ke Khiladi 11 Winner: Arjun Bijlani ने जिंकला खतरों के खिलाडी सीझन 11
Arjun Bijlani (Photo Credits: Instagram)

अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) याने खतरो के खिलाडी सीझन 11 (Khatron Ke Khiladi 11) जिंकला आहे. त्याने या स्टंट बेस्ड रिअ‍ॅलिटी शो मध्ये राहुल वैद्य, श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी, वरूण सूद आणि विशाल आदित्य सिंग यांच्यावर मात केली आहे. यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर खतरों के खिलाडी चा सारा सीझन दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa ) केप टाऊन (Cape Town) मध्ये शूट करण्यात आला आहे. कालच मुंबई मध्ये या शो च्या अंतिम एपिसोडचं शूटिंग पूर्ण झालं आहे.

कलर्स टीव्ही वर 25 आणि 26 सप्टेंबरला खतरो के खिलाडी 11 चा अंतिम सोहळा दाखवला जाणार आहे. चॅनल कडून अद्याप विजेत्याची अधिकृत घोषणा झालेली नाही पण अर्जुनच्या पत्नीने आणि चाहत्यांनी अभिनंदनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. नक्की वाचा:  'Khatron Ke Khiladi 11' मध्ये सहभागी होणार Rahul Vaidya; म्हणाला, पाणी, साप आणि उंचीची वाटते भीती.

अर्जुनच्या पत्नीची पोस्ट 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Swami (@nehaswamibijlani)

अर्जुनची पत्नी नेहा स्वामी बिजलानी हिने इंस्टाग्राम वर पोस्ट करत 'मला तुझा अभिमान आहे जान. तू काय केलंसं मला ठाऊक आहे. तुला या जगातला सारा आनंद मिळो.' या कॅप्शनसह त्यांचा फोटो पोस्ट केला आहे. अर्जुनने देखील शो जिंकल्यानंतर एक पार्टी ठेवली होती त्यामध्ये त्याचे सह स्पर्धक देखील सहभागी होते.