'Khatron Ke Khiladi 11' मध्ये सहभागी होणार Rahul Vaidya; म्हणाला, पाणी, साप आणि उंचीची वाटते भीती
Rahul Vaidya (PC- Instagram)

बिग बॉस 14 उपविजेते आणि लोकप्रिय गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आता दुसर्‍या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेणार आहेत. 'खतरों के खिलाडी 11' (Khatron Ke Khiladi 11) असे या शोचे नाव आहे. या स्टंट बेस्ड रिअॅलिटी शोमध्ये आपण भाग घेणार असल्याची पुष्टी राहुल वैद्यने केली आहे. शोमध्ये भाग घेण्याबाबत मी खूप उत्साही असल्याचेही त्याने सांगितले आहे. तो या शोच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास तयार आहे.

राहुल वैद्य यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो आपल्या शोमध्ये आपला प्रवास सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याला पाण्याची भीती वाटते आणि पोहता येत नाही. पाण्याखाली राहण्याचे एखादे स्टंट असेल आणि तो बुडायला लागला, तर त्याचे काय होईल हे त्याला ठाऊक नसल्याचेही त्याने मुलाखतीत म्हटलं आहे. (वाचा - West Bengal Elections 2021: पायल सरकार, सयोनी घोष यांच्यासह 'या' सेलेब्सच्या राजकीय कारकीर्दीचा निर्णय आज ठरणार; मतमोजणीला झाली सुरूवात)

राहुल म्हणाला की, उंची, साप आणि पाण्याचा सामना करण्यास मी उत्सुक आहे. परंतु नव्या प्रवासाबद्दल तो थोडा घाबरला आहे. पाण्याशिवाय साप आणि धोके असलेल्या खेळामध्ये होणाऱ्या प्रत्येक स्टंटची त्याला भीती वाटते.

 

View this post on Instagram

 

A post shared by RKV 💫 (@rahulvaidyarkv)

राहुल वैद्यने या शोची ऑफर आधीचं स्वीकारली असून भीतीचा सामना करण्यासाठी तो पूर्णपणे तयार आहे. राहुलने खुलासा केला की, तो 6 मे रोजी स्टंट बेस्ड रिअॅलिटी शोच्या शूटिंगसाठी कॅपटाउनला जाणार आहे. राहुल वैद्यच्या इंडियन आयडल सीझन 1 मधील गाण्यांनी बरीच प्रसिद्धी मिळविली होती. यानंतर त्याने बिग बॉस 14 मध्ये भाग घेतला, जिथे त्याला आणखी लोकप्रियता मिळाली. आता गर्लफ्रेंड्स दिशा परमारसोबतच्या नात्यामुळे राहुल वैद्य सतत चर्चेत असतो.