West Bengal Elections 2021: पायल सरकार, सयोनी घोष यांच्यासह 'या' सेलेब्सच्या राजकीय कारकीर्दीचा निर्णय आज ठरणार; मतमोजणीला झाली सुरूवात
पायल सरकर, सयोनी घोष आणि यश दासगुप्ता (Photo Credits: Instagram)

West Bengal Elections 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय क्षेत्रात आपला विजय निश्चित करण्यासाठी अनेक व्हीआयपी आणि सेलिब्रिटी उमेदवारांना राजकीय पक्षांनीही तिकिटे दिली होती. आज आम्ही तुम्हाला त्या सितार्‍यांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी यंदाच्या पश्चिम बंगाल निवडणुकीत विविध पक्षांच्या तिकिटावर आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आज सगळ्यांची नजर या सेलिब्रेटींवर आहे. यापैकी कोणास जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईल. (वाचा - West Bengal Elections Results 2021 नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जींना टक्कर देणारे BJP चे Suvendu Adhikari आघाडीवर)

अभिनेत्री पायल सरकार (Paayel Sarkar)

अभिनेत्री पायल सरकार यांनी भाजपच्या तिकिटावर बेहाला पुर्वा मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Paayel Sarkar (@paayelsarkar)

सयोनी घोष (Saayoni Ghosh)

बंगाली अभिनेत्री सयोनी घोष यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या तिकीटावर आसनसोल दक्षिण जागेवर निवडणूक लढविली आहे. या जागेवरुन केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी 2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीत दोनदा विजय मिळवला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saayoni Ghosh (@sayanigh)

यश दासगुप्ता (Yash Dasgupta)

भाजपने बंगाली अभिनेता यशदास गुप्ता यांना त्यांच्या चंदिताला विधानसभा मतदार संघातून (हुगळी) उभे केले. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@yashdasgupta)

सयांतिका बनर्जी (Sayantika Banerjee)

बॉलिवूड अभिनेता सयंतिका बॅनर्जी यांनी टीएमसीच्या तिकिटावर बंकुरा मतदारसंघातून निवडणूक लढविली. निवडणूक रिंगणात त्यांचा सामना भाजपाचे उमेदवार निलाद्री शेखर दाना यांच्याशी आहे.