Bakra Eid 2019 च्या पूर्वसंध्येला सलमान खान कडून बिग बॉस मराठी 2 च्या स्पर्धकांना, चाहत्यांना सरप्राईज; Weekend चा डाव मध्ये हजेरी
Salman Khan in Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये खेळ आता अधिक चुरशीचा झाला आहे. आज (11 ऑगस्ट) च्या विकेंडच्या डाव (Weekend Cha Daav)एपिसोडमध्ये बिग बॉस मराठी 2 च्या सदस्यांसोबत चाहत्यांना एक मोठं सरप्राईज देणार असल्याची माहिती कालच्या एपिसोडमध्ये महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) दिली होती. आता हे सरप्राईज म्हणजे खुद्द बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान (Salman Khan) आहे. सलमान खानने नुकतीच बिग बॉस मराठी 2 च्या सेटवर भेट देऊन प्रेक्षकांना खूष केलं आहे.

विकेंडचा डाव मध्ये होस्ट महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेतात. आज त्यांच्या सोबतीला सलमान खानदेखील असणार आहे. लवकरच हिंदी बिग बॉस 13 ला देखील सुरूवात होणार आहे. हिंदी बिग बॉस सलमान खान त्यांच्या हटके अंदाजात होस्ट करतो.  पहा आत्तापर्यंत काय घडलंय बिग बॉस मराठी 2 च्या घरात?   

बिग बॉस मराठी 2 मध्ये सलमानची हजेरी

#BiggBossMarathi2 च्या घरात येणार जान, जेव्हा #WeekendChaDaav मध्ये येणार 'भाईजान'...

पाहा #BiggBossMarathi2 सोम-शनि. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @manjrekarmahesh @BeingSalmanKhan pic.twitter.com/4B6EAY9l66

— Colors Marathi (@ColorsMarathi) August 11, 2019

आज बिग बॉस मराठी 2 रात्री 8 वाजता

#WeekendChaDaav मध्ये सलमान खान करणार दबंग entry. पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 8 वा. #ColorsMarathi वर. @ArohWelankar @Nehashitolefc1 @abhijeetkellkar @officialveenie @imsurveshivani @TheHeenaPanchal @GmKishori @manjrekarmahesh pic.twitter.com/dmjdgcp55h

— Colors Marathi (@ColorsMarathi) August 11, 2019

सलमान खान आणि महेश मांजरेकर यांची मैत्री सर्वश्रूत आहे. महेश मांजरेकरांची लेक अश्वमी सलमानच्या 'दबंग 3' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे सलमान खान बिग बॉस मराठी 2 मध्ये हजेरी लावण्याची शक्यता असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर सलमानने त्याच्या मराठमोळ्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे.

सलमान खानने यापूर्वी रितेश देशमुखच्या 'लय भारी' सिनेमामध्ये कॅमिओच्या रूपात छोटीशी भूमिका केली होती. तसेच झी मराठी वरील चला हवा येऊ द्या या शो मध्येही सलमानने हजेरी लावली होती. सलमान खान बिग बॉस 13 सह दबंग 3, संजय लीला भंसाळींच्या इन्शाअल्लाह या सिनेमांची ट्रीट घेऊन येणार आहे.