Uttar Ramayan Re Telecast Schedule: भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान टेलिव्हिजन वर रामायण मालिका सुरू करण्याचं देशवासियांनी आवाहन केलं होतं. त्यानुसार डीडी नॅशनलवर नियमित रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेचे प्रक्षेपण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात 'रामायण' मालिकेला पुन्हा रसिकांनी उदंड प्रतिसाद दिल्यानंतर आता 'उत्तर रामायण' देखील सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 'उत्तर रामायण' हे रविवार (19 एप्रिल) पासून रात्री 9 वाजता प्रक्षेपित होणार आहे. तर दुसर्या दिवशी सकाळी त्याचा रीपीट टेलिकास्ट दाखवला जाईल. 1987 साली रामायण मालिका 87 एपिसोड्स सह प्रक्षेपित करण्यात आली होती. यामध्ये अरूण गोविल यांनी प्रभू श्रीरामाची तर दीपिका चिखालिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती.
उत्तर रामायण हे 'लव- कुश' म्हणून 1988 साली प्रसारित करण्यात आले होते. यामध्ये मराठमोळा स्वप्नील जोशी झळकला होता. त्याच्यासोबत मयूरेश क्षत्रदे देखील होता. रामायणाप्रमाणे 'उत्तर रामायण' रोज नवा एपिसोड असा टेलिकास्ट न करता रात्री 9 वाजता नवा एपिसोड आणि दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजता त्याचं रिपीट टेलिकास्ट दाखवलं जाणार आहे. उत्तर रामायणचे 44 एपिसोडस असून 10मे पर्यंत त्याचे प्रक्षेपण सुरू राहणार आहे. Ramayana Characters Memes: रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील 'कुंभकर्ण', 'लक्ष्मण' पात्रावरील मीम्सचा सोशल मीडियात पाऊस!
उत्तर रामायण चे देखील होणार प्रसारण
Watch #Ramayan and #UttarRamayan on @DDNational. Here's the Schedule. pic.twitter.com/NXUwNZathw
— Doordarshan National (@DDNational) April 17, 2020
भारतामध्ये 24 मार्चला जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन पुढे 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात घरामध्ये अडकून पडलेल्या भारतीयांच्या मनोरंजनासाठी अनेक जुन्या मालिका डीडी वर पुन्हा प्रक्षेपित केल्या जात आहेत. दरम्यान रामायणाप्रमाणेच महाभारत, चाणाक्य, श्रीमान श्रीमती, सर्कस सारख्या मालिका दाखवल्या जात आहेत. रामायण मालिकेने लॉकडाऊनच्या काळात टीआरपी मध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.