एक काळ असा होता की रामानंद सागर यांची 'रामायण' (Ramayana) मालिका दूरदर्शनवर सुरू होती म्हणून रस्ते ओस पडायचे, आणि आता कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे भारतीय जनता क्वारंटीन झाल्याने 'रामायण' च्या पुन्हा प्रेमात पडली आहे. सध्या दिवसातून 2 वेळेस डीडी वर रामायण दाखवलं जातं आणि आजची तरूणपिढीदेखील पुन्हा रामायण पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसायला लागली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच रामायण मध्ये कुंभकर्णाचं (Kumbhakarna) पात्र दाखवण्यात आलं. रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा केवळ झोपाळू म्हणून अनेकांना माहित होता. पण 2-3 एपिसोडच्या त्याच्या एंट्रीमध्ये अनेकांना त्याच्या व्यक्तिमत्त्वातील इतर गुणही पहायला मिळाले. यानंतर सोशल मीडियावर कुंभकर्णाच्या मीम्सचा पाऊस पडायला लागला. सध्या क्वारंटीनमध्ये अनेक जण कुंभकर्णाप्रमाणेच फक्त खातात आणि झोपातात. इतकाच अनेकांचा दिनक्रम आहे.
कुंभकर्णाप्रमाणेच श्रीरामाचे आणि लक्ष्मणाचे बंधुप्रेम, लक्ष्मणाचं (Lakshman) लहान सहान गोष्टींवर आक्रमक होणं यावरूनही अनेक मीम्स फिरायला सुरूवात झाली आहे. सुनील लहेरी यांनी रामायण मालिकेत लक्ष्मणाचं पात्र साकारलं आहे. सोशल मीडियावरील लक्ष्मण पात्रावरील मिम्सवर त्यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 'रामायण'ने तोडले आतापर्यंतचे सर्व विक्रम; स्टार प्लस, झी टीव्हीच्या मालिकांना मागे टाकून TRP मध्ये ठरला अव्वल.
कुंभकर्णावरील मजेशीर मिम्स
कुंभकर्णाबद्दलही वाढला आदर
तुमच्यातील कुंभकर्णाची लक्षणं
तुम्ही पण कुंभकर्ण?
लक्ष्मणावरील मजेशीर मिम्स
सध्या दूरदर्शनवर सकाळी आणि रात्री 9 वाजता रामायण मालिका दाखवली जाते. लॉकडाऊनच्या काळात लोकाग्रहास्तव रामायण आणि महाभारत या पौराणिक मलिकांसोबतच शक्तिमान, जंगलबुक यासारखी मजेशीर तर श्रीमान श्रीमती, सर्कस, चाणक्य यासारख्या मालिकादेखील पुन्हा प्रसरित केल्या जात आहेत.