Bigg Boss Marathi 2 Day 12 Episode Preview: टास्कमधील गैरवर्तणुकीमुळे शिवानी-वीणा होणार घराबाहेर? काय असेल बिग बॉसचा निर्णय
Shivani - Veena (Photo Credits: Twitter)

'बिग बॉस मराठी 2' (Bigg Boss Marathi 2) मधील वातावरण दिवसेंदिवस हिंसात्मक देखील बनत चालले आहे यंदा याची सुरुवात मुलींपासून झाली असून अभिनेत्रींमध्ये जास्त हाणामारी पाहायला मिळतेय. 2 दिवसापूर्वी झालेल्या चोर बाजार टास्कमध्ये वीणा जगताप (Veena Jagtap) आणि शिवानी सुर्वे (shivani Surve) मध्ये झालेली बाचाबाची सध्या जास्तच चर्चेचा विषय बनत चालली आहे. या टास्कमध्ये दोघींमधील हाणामारी इतकी विकोपाला गेली की त्याचे रुपांतर लाथाबुक्क्यांमध्ये झाले. म्हणूनच बिग बॉसने यावर कठोर निर्णय घेत या दोघींनी अपात्र ठरवले आहे. मात्र गैरवर्तणुकीबद्दल त्या दोघींना काय शिक्षा मिळेल हे आजच्या भागात कळेल.

दोन दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी 2 मध्ये झालेला चोरबाजार चा टास्क चांगलाच रंगला. यात टीम बी विजयी झाली ज्यात किशोरी शहाणे, वीणा जगताप, सुरेखा पुणेकर, शिव ठाकरे, पराग कान्हेरे, वैशाली माडे हे सदस्य होते. मात्र टास्क करत असताना टीम ए मधील शिवानी बरोबर वीणाची थोडी बाचाबाची झाली. ज्यात दोघींनी एकमेकींवर शारीरिक बळाचा वापर केला. म्हणून बिग बॉसने या गोष्टीचा तीव्र निषेध करत या दोघींना अपात्र ठरवले आहे. मात्र त्यावर शिक्षा म्हणून त्यांनी अडगळीच्या खोलीत ठेवतील, पुढील आठवड्यासाठी नॉमिनेट करतील की घराबाहेर काढतील हे आजच्या भागात कळेल.

Big Boss Marathi 2 Day 12 Episode Preview: अभिजीत बिचुकले यांनी गायले शिवानीसाठी सलमानच्या चित्रपटातील सुपरहिट गाणे, काय असेल शिवानीची रिअॅक्शन

शिवानी सुर्वे आपल्या हिंसक वृत्तीमुळे आणि वीणा आपल्या सडेतोड बोलण्यामुळे आधीच चर्चेत होत्या. त्यात आता या कृत्यामुळे त्यांना काय शिक्षा होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.