Bigg Boss Marathi 2 Day 12 Episode Preview: अभिजीत बिचुकले यांनी गायले शिवानीसाठी सलमानच्या चित्रपटातील सुपरहिट गाणे, काय असेल शिवानीची रिअॅक्शन
Abhijit Bichukle shivani surve (Photo Credits: Twitter)

'बिग बॉस मराठी 2' (Bigg Boss Marathi 2) मधील एक स्पर्धक जे कोणत्याही टास्कमुळे नाही, कामामुळे नाही तर केवळ त्यांच्या सतत बडबडीमुळे आणि अंतरंगी चाळ्यांमुळे लोकप्रिय आहे ते म्हणजे कविमनाचे नेते अभिजीत बिचकुले. (Abhijit Bichukle)पहिल्या दिवसापासून त्यांच्यामागे हात धुवून मागे लागलेली त्यांची शत्रू शिवानी सुर्वे (Shivani Surve) आता त्यांची चांगली मैत्रिण झाली आहे. त्यामुळे बिचुकले नेहमी शिवानीसाठी काही ना काही विनोदी गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात. आता तर त्यांनी शिवानीसाठी सलमानच्या 'तेरे नाम' या सुपरहिट चित्रपटातील एक सुंदर गाणे गायले आहे. हा एपिसोड आज कलर्स मराठी वाहिनी वर दाखवला जाईल.

ह्या प्रोमो मध्ये ते तिची परवानगी घेऊन तिच्यासाठी गाणे गाताना दिसत आहे. जे गाणे शिवानी ही मन लावून ऐकताना दिसतेय. मात्र यावर तिची काय प्रतिक्रिया असेल ते गाणे ती हसण्यावारी नेईल की खरंच त्यांची मनापासून स्तुती करेल हे तुम्हाला आजच्या भागात पाहायला मिळेल.

Bigg Boss Marathi 2: बिग बॉस घरात हाणामारी; शिवाणी सुर्वे, वीणा जगताप खेळातून बाद होण्याचे संकेत

'बिग बॉस मराठी 2' चे आतापर्यंत झालेल्या भागांमध्ये अभिजीत बिचुकले नेहमीच शिवानीसाठी काही ना काही करताना दिसतात. ती त्यांच्यावर कितीही रागवली तरी तिला मनवण्याचा, तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न दिसतात. त्यामुळे आता त्यांनी गायलेले 'तुमसे मिलना बातें करना बडाअच्छा लगता है' हे गाणे जणू त्यांची तिच्याविषयी मनात असलेली भावना तर नव्हे ना असा प्रश्न पडलाय. याचे उत्तर तुम्हाला हवे असेल तर आजचा बिग बॉस मराठी 2 चा भाग अवश्य पाहा.