Iphone 13 लॉन्च इव्हेंटमध्ये वाजले भारतातील प्रसिद्ध गाणे Dum Maro Dum चे म्युझिक, Zeenat Aman दिली 'अशी' प्रतिक्रिया
Iphone 13 (Photo Credit: Twitter)

अॅपल 13 (iPhone 13) सीरिजच्या इव्हेंटकडे जगभरातील यूजर्सचे लक्ष लागले होते. हजारो युजर्स आयफोन 13 सीरिज कधी लॉन्च होते, याच्या प्रतिक्षेत होते. अखेर मंगळवारी रात्री आयफोन 13 लॉन्च झाला आहे. मात्र, या इव्हेंटने संपूर्ण भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. या इव्हेंटमध्ये भारतीतील लोकप्रिय गाणे दम मारो दमचे म्युजिक ऐकायला मिळाले आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. यानंतर जीनत अमान (Zeenat Aman) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, या चित्रपटाचे चित्रीकरण काठमांडूमध्ये करण्यात आले आहे. जेव्हा मी हे गाणे ऐकले तेव्हा मला ते खूप आवडले. चार्टबस्टर इतके आश्चर्यकारक काम करेल असे वाटले नव्हते. आजही मी जिथे जातो तिथे या गाण्याबद्दल चर्चा ऐकतो. आजही त्यांनी या गाण्याच्या वापराबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच '1971 चे संगीत 40 वर्षांनंतरही गुंजत आहे! काय गाणे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा-Ranveer Singh आणि Deepika Padukone यांनी आलिबाग मध्ये घेतले 22 कोटी रुपयांत आलिशान घर?

देव आनंद आणि झीनत अमान यांचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी या गाण्याला मोठी पसंती दाखवली होती. महत्वाचे म्हणजे, या गाण्याला अनेक वर्ष उलटून गेली असली तरी, लोक आजही आवडीने हे गाणे ऐकतात.

लॉन्चिगच्या आधीच आयफोन 13 स्पेसिफिकेशन लीक्स झाले होते. iPhone 13 सीरीज आजवरच्या आयफोनमध्ये सर्वाधिक वेगवान असेल. आयफोन 13 ची मॉडेल्स 128 जीबी, 256 जीबी, 512 जीबी आणि 1 हजार जीबी (1 टीबी) स्टोअरेजसोबत येतील, असा दावा आयफोनने केला आहे.