Ranveer Singh आणि Deepika Padukone यांनी आलिबाग मध्ये घेतले 22 कोटी रुपयांत आलिशान घर?
दीपिका-रणवीर (Photo Credits : Instagram)

रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे दोघे सध्या यशाच्या शिखराच्या अधिकाधिक उंचीवर जात असल्याचे दिसून येत आहे. दोघांच्या ब्रँन्ड वॅल्यू मध्ये सुद्धा तुफान वाढ झाली आहे. याच कारणामुळे सिनेमे ते जाहिरातींमध्ये रणवीर आणि दीपिका यांचा बोलबाला आहे. अशातच या दोघांच्या संबंधित एक बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, रणवीर आणि दीपिका यांनी अलिबाग मध्ये आपल्या स्वप्नातील घर खरेदी केले आहे. ज्यासाठी त्यांनी 22 कोटी रुपयांची रक्कम देऊ केली आहे.(लवकरच Varun Dhawan करणार डिजिटल डेब्यू; दिसणार Priyanka Chopra अभिनित Citadel च्या हिंदी आवृत्तीमध्ये- Reports)

मीडिया रिपोर्ट्सनुसा, अलिबाग मध्ये 9 हजार स्क्वेअर मीटर एक प्रॉपर्टी त्यांनी खरेदी केली आहे. त्यासाठीच त्यांनी 22 कोटी रुपये दिले आहेत. ऐवढेच नव्हे तर 1.32 कोटी रुपयांची स्टँम्प ड्युटी भरली आहे.(The Incarnation Sita: अभिनेत्री Kangana Ranaut साकारणार रूपेरी पडद्यावर 'सीता'; पोस्टर शेअर करत दिली माहिती)

याआधी असे समोर आले होते की, या दोघांनी बंगळुरु मध्ये खरेदी केली आहे. त्यांनी एका कंस्ट्रन्शन सुरु असलेल्या ठिकाणच्या एका उंच इमारतीत फ्लॅट बुक केला आहे. त्यानंतर आता अलिबाग मधील मापगावात प्रॉपर्टी खरेदी केल्याचे समोर आले आहे. रणवीर आणि दीपिका यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास हे दोघे सिनेमा 83 मध्ये एकत्रित दिसून येणार आहेत. तर कोरोनाच्या परिस्थितीमुळे अद्याप हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आलेला नाही.