#MeToo कैलाश खेरवर सोना मोहपात्रानंतर 'या' गायिकेचा आरोप
कैलाश खेर ( फोटो सौजन्य - फेसबुक)

सध्या सोशल मीडियावर चालू झालेल्या मी टू या मोहिमे अंतर्गत अत्याचार झालेल्या महिला  जगासमोर येत आहेत. त्यामुळेच कैलाश खैरवर काही दिवसांपूर्वी सोना मोहपात्रा आणि एका फोटो जरनलिस्टने मी टू संदर्भात गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. मात्र आता एका नव्या गायिकेने यामध्ये उडी घेतली आहे.

वर्षा सिंग असं या गायिकेचे नाव आहे. कैलाश खेरची 2015 रोजी वर्षा सिंग हिच्याशी पहिल्यांदा दुबईच्या विमानतळावर भेट झाली होती. त्यानंतर या दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरसुद्धा शेअर केले होते. पण नंबर दिल्याच्या काही दिवसानंतर कैलाश खेर याने वर्षा हिला फोन करुन भेटण्याची गळ घातली आणि माझ्यासोबत रिलेशन ठेवण्यासाठी विचारणा केली. त्याचवेळी कैलाशने माझ्याशी गैरवर्तन केल्याचे वर्षा हिने मिडियासमोर स्पष्टपणे सांगितले आहे.

यापूर्वीसुद्धा एका मुलाखतीच्या वेळी कैलाशने एका फोटो जर्नलिस्ट आणि माझ्या मांड्यावर सारखा हात फिरवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या घटनेवर कैलाशने स्पष्टीकरण देत, 'असे काही झाल्याचे मला आठवतही नाही, परंतु काही गैरसमज झाला' असल्याने त्याने माफीसुद्धा मागितली होती.