Bhairavi Vaidya | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. सिनेसृष्टी त्या खूप जवळून निघडीत होत्या. अभिनय, दिग्दर्शन, निर्माता अशा विविध भूमिकांतून त्या चाहते आणि प्रेक्षकांना भेटत असत. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर गुजराती चित्रपटांतूनही काम केले. ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘ताल’, ‘व्हॉट्स योर राशी’, ‘हमराज’, ‘क्या दिल ने कहा’, यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल्या. त्यांनी विविध टीव्ही मालिकांमध्यूनही काम केले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 8 ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदीर्घ काळापासून त्या कॅन्सर आजाराशी झुंजत होत्या. अखेर त्यांचा लढा अयशस्वी ठरला. त्यांच्या निधनाचे वृत्त काहीशी उशीरानेच त्यांच्या चाहत्यांना समजली.

भैरवी यांना अभिनयाची आवड होती. सध्या त्या डेन्झोंगपा या मालिकेत काम करत होत्या. खास करुन त्यांनी 'हसरते' आणि 'महिसागर' या मालिकांतून केलेल्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. त्यांच्या जाण्याने चाहते आणि त्यांच्या निकटवर्तींयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आणि काम केलेल्या अनेक सहकलाकारांनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्या स्वभावाने अतिशय विनम्र आणि दिलखूलास होत्या. त्यांना गप्पा मारायला आवडायचे. त्यांचा विविध विषयांवरचा अभ्यास चांगला होता. त्या चांगले वाचन करत असत. शिवाय त्यांच्याकडे माणसे जोडण्याची विशेष कला होती. त्यामुळे त्यांचा सहवास हा सुद्धा अनेकांसाठी आनंदाचा विषय ठरत असे. (हेही वाचा, Ravindra Mahajani Passes Away: वयाच्या 77 वर्षी रवींद्र महाजनी यांच निधन; राहत्या घरात सापडला मृतदेह)

भैरवी यांनी 'ताल' चित्रपटातून सीनेअभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. या चित्रपटात तिने जानकी नावाच्या महिलेची भूमिका साकारली होती. ज्याचे समिक्षक आणि प्रेक्षकांकडून मोठे कौतुक झाले. पुढे त्यांना सलमान खान अभिनीत 'चोरी चोरी चुपके चुपके' चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. जी त्यांनी कामाच्या जोरावर स्मरणीय बनवली. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर गुजराती नाट्यसृष्टीतही चांगले काम केले. त्यांनी अनेक मराठी, गुजराती चित्रपट आणि नाटके केली आहेत. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग मराठी आणि गुजराती अशा दोन्ही भाषकांमध्ये पाहायला मिळतो.

एकाच वेळी दोन भाषांमध्ये (मराठी, गुजराती) काम करताना भैरवी यांनी कोणताच अडथळा येऊ दिला नाही. दोन्ही भाषकांना त्या आपल्याच वाटाव्या इतके त्यांचे दोन्ही भाषांवर प्रभुत्त्व होते. त्यांचा अभिनय आणि त्यांनी पडद्यावर साकारलेल्या भूमिका यावर त्यांच्या चाहत्यांनी, रसिकांनी मनापासून प्रेम केले. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रामध्ये मोठी चुटपूट लागून राहिली आहे.