Ravindra Mahajani Death: मराठी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचा राहत्या घरी मृतदेह (Deathbody) आढळला आहे. शुक्रवारी सायंकाळी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह बंद घरात आढळला आहे. वयाच्या 77 वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मावळ (Maval) तालुक्यातील आंबी येथे त्याच्या राहत्या घरी मृतदेह सापडला. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून ते आंबी येथेच राहत होते. अशी माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसुष्टीत शोककला पसरला आहे.
आंबी येथे राहत्या ठिकाणी ते भाड्याने खोली करुन राहत होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारच्यांना पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलीसांनी घरात प्रवेश केला. तपासणी दरम्याना त्यांना रवींद्र महाजनी यांचा मृतदेह सापडला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी दिला आहे. तात्काळ पोलीसांनी महाजनी कुंटूबीयांना माहिती देण्यात आली. गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील मराठी चित्रपट क्षेत्रात काम करतो.
अभिनयाची आवड म्हणून त्यांनी नाटकांतून सुरुवात केली. चित्रपट सुष्टीत १९७५ ते १९९० चा काळ त्यांनी गाजवला. देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. त्या काळी ते अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. रवींद्र महाजनी यांचा " मुंबईचा फौजदार" , देवता हे चित्रपट खूप गाजले. रवींद्र माहाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली. मात्र त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. मराठी चित्रपटसुष्टीतले अनेक दिग्दज मंडळींनी रविंद्र यांच्या निधनाता शोक व्यक्त केला आहे.