Accident (PC- File Photo)

Nashik Chauafali Road Accident:  नाशिक जिल्ह्यातील चांदवड भागातील चौफळी मार्गावर रविवारी पुन्हा भीषण अपघात घडून आला आहे. या अपघाता दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाल्याची माहिती  समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे अपघातात मृत झालेल्यांपैकी एक तीन वर्षाची चिमुकल्याचा समावेश आहे.  हा अपघात ओमनी कार आणि एर्टिगाच्या  धडकेत अपघात घडून आला. जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळच्या  पोलीस ठाण्यात माहिती कळवताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला.

शिरवाडे वणी फाट्यावर हा अपघात घडून आला आहे. रविवारी रात्री ओमणी कार घेवून एक कुटूंब नाशिकहून चांदवड तालुक्यातील वजनेरभैरव येथे जात होते. रस्तावरून वडनेरभैरव कडे वळत असताना पाठीमागून भरभाव एर्टीगा कारने ओमनीला जोरदार धडक दिली. . या धडकेत ओमनी कार च्या डाव्या बाजूचा चेंदामेंदा झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोघांचे जागीचं मृत्यू झाले. तर या अपघातात पाच जण गंभीर पध्दतीने जखमी झाले.

या अपघातात दुर्दैवाने तीन वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. जखमी झालेल्या लोकांवर पिंपळगाव परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  या अपघाताची माहिती मिळताच शिरवाडा भागातील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लागलीच अपघात स्थळी पोहोचली. तात्काळ त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. जोरदान धडकेत दोघांचे मृत्यू झाल्या प्रकरणी पोलीसांना कळवण्यात आले आहे. या मार्गावर अपघाताची मालिका सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.