Accident (PC - File Photo)

Yavatmal Road Accident:  यवतमाळ जिल्ह्यात सकाळी सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.  करंजीपासून दीड किलोमीटर अंतरावर कोठोडा गावाजवळ ओमानी गाडीचा दुर्दैवी अपघात झाला. सकाळच्या  सुमारास एका अज्ञात गाडीला धडक लागली. धडक इतकी भंयकर होती की, कारचा चकाणाचुर झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. या अपघातात एकजण  गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातील कंरजीपासून दीड किलोमीटर अंतरावर कोठोडा गावात एका ओमनी आणि अज्ञात गाडीच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतू अपघात इतका भीषण होता की, गंभीर जखमा झाल्या, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यावर उपचार सुरू केले. उपाचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ओमानी कार आणि त्या गाडीच्या धडकेत दुर्दैवी अपघात घडून आला. धडकेत कारच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे.  नागपूरवरून मराठी दैनिक वृत्तपत्र पार्सल घेऊन येणारी ओमनी कार आज सकाळी मारेगाव येथे वृत्तपत्र पार्सल देत पांढरकवडा कडे रवाना झाली. राज्य महामार्गावर असलेल्या कोठोडा पुलाजवळ समोरून येत असलेल्या भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली. पोलीस ठाण्यात खबर देताच पांढरकवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.