Karan Johar ने काढलं भात्यातील 'ब्रह्मास्त्र'; Shahrukh Khan करणार Ranbeer-Alia सोबत काम
Srk Ranbir Alia | (File)

करण जोहर (Karan Johar) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) या जोडगोळीने आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. करण जोहरला निर्माता आणि दिग्दर्शक दोन्ही पैलूंसाठी शाहरुख फलदायी ठरलेला आहे. आता त्याने पुन्हा एकदा हा हुकुमी एक्का वापरण्याचा निर्णय घेतला आहे. अयान मुखर्जी बनवत असलेल्या 'ब्रह्मास्त्र' या त्याच्या महत्वाकांक्षी सिनेमामध्ये त्याने शाहरुखला घ्यायचं ठरवलं आहे.

ब्रह्मास्त्र अगोदर 'दबंग 3' सोबत ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. पण आता हा सिनेमा लांबणीवर गेला आहे. शाहरुखने याआधी आलिया सोबत 'डिअर जिंदगी' मध्ये काम केलं होतं. तर रणबीरसोबत 'ए दिल है मुश्किल' मध्ये दिसला होता. हा दोन्ही सिनेमे हिट झाले होते. आतांब्रह्मास्त्र सुद्धा त्याच मार्गाला जाऊन हिट होतो का हे बघणं औत्सुक्याचं आहे.

शाहरुखची या चित्रपटातील भूमिका ही कथानकाच्या दृष्टीने फार महत्वाची असणार आहे. ती अगदी पाहुण्या कलाकाराची नसून कथा पुढे नेण्यात तिचा मोठा वाटा असणार आहे. रणबीरच्या भूमिकेला कलाटणी देण्याचं कार्य ती भूमिका करेल असं दिग्दर्शक अयान मुखर्जीने म्हटले आहे. ही भूमिका खास शाहरुखला डोळ्यासमोर ठेऊन लिहिण्यात आलेली आहे. शाहरुखची भूमिका असलेला सिनेमाचा भाग या वर्षाअखेर चित्रित केला जाईल. (हेही वाचा. Aishwarya Rai Bachchan च्या मॅनेजर साठी Shah Rukh ठरला 'हिरो'; प्रसंगावधान राखून वाचवले प्राण)

अयान मुखर्जी याबाबत सांगताना म्हणाला,''चित्रपट लांबणीवर पडणं ही चित्रपटासाठी चांगली बाब आहे. कारण ब्रह्मास्त्रचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती गोष्ट गरजेची देखील होती.''

ब्रह्मास्त्र तीन भागांमध्ये बनवला जाणार आहे. या चित्रपटाची कल्पना आणि त्यावरील कार्य हे अयान मुखर्जीने 2011 पासून सुरु केले होतं. भारतीय सिनेमासृष्टीला काहीतरी अद्भुत, नवं आणि व्हिजुअल एफ्फेट्सच्या बाबतीत अकल्पनीय असं काहीतरी देण्याचा विचार हा चित्रपट बनवण्याच्या मागे आहे, असेही तो म्हणाला.