Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

सध्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) सोशल मिडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यामुळे लोकांमध्ये खोट्या बातम्या पसरवून दहशत निर्माण करणे, ट्रोल करणे यांसारखे टुकार धंदे करणा-या खोट्या फॉलोअर्सची संख्या देखील वाढत चालली आहे. यामुळे अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिले आहे. ज्या PR Agencies (जनसंपर्क संस्था)बॉलिवूड कलाकारांचे सोशल मिडियावरील फॉलोअर्स वाढविण्यासाठी खोटे फॉलोअर्स बनवतात. त्यामुळे चुकीच्या पोस्ट आणि स्टार्सना ट्रोलिंग करण्याचे प्रकार देखील वाढले आहे. यामुळे अशांवर महाराष्ट्र पोलिस कडक कारवाई करणार असेल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

कलाकारांसाठी असलेल्या अनेक पीआर एजन्सीज कलाकारांचे फॉलोअर्स वाढविण्यासाठी आणि या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी सोशल मिडियावर अनेकदा खोटे फॉलोअर्स बनवितात ज्याला Bots (बोट्स) म्हणतात. यामुळे कलाकारांना ट्रोलिंग करणे आणि चुकीच्या खोट्या बातम्या सोशल मिडियावर व्हायरल करणे यांसारखे प्रकार देखील सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात वाढतायत. या गोष्टींना आळा घालण्यासाठी अशा बोट्स वर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. काजोल ची लेक न्यासा झाली Troll; मेकअप पाहून नेटक-यांनी दिल्या 'अशा' Comments

पाहा ट्विट:

अशा खोट्या फॉलोअर्समुळे आणि त्यांच्याकडून होणा-या या चुकीच्या गोष्टींमुळे लोकांमध्ये अनेकदा भीतीचे वातावरण पसरते. त्यासोबतच या ट्रोलर्सचा प्रचंड मनस्ताप कलाकारांना सहन करावा लागतो. या गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि या खोट्या फॉलोअर्सला चाप बसण्यासाठी गृहमंत्र्यांनी हा हे कठोर पाऊल उचलले आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन आधीच लोक पिचून गेले आहेत. अशातच या बोट्समुळे लोकांना विशेषत: कलाकारांना आणखी त्रास सहन करावा लागू नये यासाठी अनिल देशमुखांनी ही महत्वाची घोषणा केली आहे.