काजोल ची लेक न्यासा झाली Troll; मेकअप पाहून नेटक-यांनी दिल्या 'अशा' Comments
Nysa Makeup (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड स्टारकिड्स (Bollywood Starkids) नेहमीच ट्रोलर्सच्या रडारवर असतात. सतत काही ना काही ना कारण शोधून बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टारच्या मुलांना ट्रोल करणं हा जणू त्यांचा जन्मसिद्ध हक्क बनलाय असं म्हणायला हरकत नाही. त्यात शाहरुख खान, काजोल, सैफ अली खान ची मुलं ट्रोल होत असतात. काजोलची (Kajol) मुलगी न्यासावर (Nysa) पुन्हा एकदा ट्रोलर्सने निशाणा साधला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी त्यांनी तिच्या गोल्डन गाऊनमधील अतिशय सुंदर फोटोला ट्रोल केले आहे. न्यासाने हे पहिले फोटो शूट असल्याचे या फोटोमध्ये म्हटले आहे.

न्यासाने या फोटोत सुंदर गोल्डन रंगांचा गाऊन घातला आहे. त्यात तिचा क्युट अंदाज लोकांना भावेल असाच आहे. मात्र ट्रोलर्सने तिने केलेल्या मेकअपवरुन ट्रोल केले आहे. आपल्या मुलीच्या ट्रोल्स विषयी काय म्हणाली अभिनेत्री काजोल? पाहा कोणत्या शब्दात व्यक्त केला संताप

पाहा कमेंट्स:

 

View this post on Instagram

 

#nysadevgan looking so pretty in her first ever photo shoot ❤

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

याआधीही न्यासाला अनेकवेळा ट्रोल केले गेले आहे. त्यावर तिची आई काजोल ने ‘ती सेलिब्रिटी किड असल्यामुळे तिला अशाप्रकारे ट्रोल केलं जात आहे’असे सांगितले होते. इतकच नव्हे तर "न्यासाच्या जागी तुमचे आई-वडिल किंवा कुटुंबीय असते तर तुम्ही काय केलं असतं?" असं एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

या आधी अभिनेता अजय देवगण यानेसुद्धा न्यासाच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, “सेलिब्रिटींची मुलं असल्याचा फटका त्यांनी का भोगावा? कधीकधी ते इतके लहान असतात की फोटोग्राफर्ससमोर कसं वागावं हे देखील त्यांना नाही समजत. त्यांना मुक्त वावरण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं.”