Oscars 2021 Winner List: ऑस्कर 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरला 'Nomadland', येथे पाहा विजेत्यांची यादी
Oscars 2021 (Photo Credits: Twitter)

जगातील महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा ऑस्कर 2021 (Oscars 2021) पुरस्कार सोहळा लॉस एजेंलिसमध्ये काल म्हणजेच 25 एप्रिलच्या रात्री पार पडला. अभिनेत्री प्रियंका चोपड़ा आणि निक जोनस यांनी काही दिवसांपूर्वी ऑस्कर 2021 पुरस्कार सोहळ्याची नामांकन जाहीर केली होती. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नोमाडलैंड' (Nomadland) हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरला. तर 'एंथनी हॉपकिंस' (Anthony Hopkins) यांना द फादर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर फ्रांसेस मैकडॉर्मेंड (Frances McDormand) यांना नोमाडलैंड सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ऑस्कर सोहळ्याची संपूर्ण सिनेविश्वाला उत्सुकता असते. जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या नामांकन मिळालेली असतात. त्यामुळे जगभरातील कलाकांरासह तमाम रसिक प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात.हेदेखील वाचा- Oscars 2021 Nominations: प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनी केली 'ऑस्कर 2021' च्या नामांकनाची घोषणा, पहा संपूर्ण यादी

पाहूयात Oscars 2021 विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट- Nomadland

सर्वोत्कृष्ट अभिनेता- एंथनी हॉपकिंस (द फादर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- फ्रांसेस मैकडॉर्मेंड (नोमाडलैंड)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- चुलू जौ (नोमाडलैंड)

बेस्ट सपोर्टिंग एक्टर- डैनियल कलुया (जुडास एंड द ब्लैक मसीहा)

बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस- यून यू-जंग (मिनारी)

बेस्ट ओरिजनल सॉन्ग- फाइट फॉर यू (जूदास एंड द ब्लैक मसीहा)

बेस्ट ओरिजनल स्कोर- सोल

बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- Emrald Fennel(प्रोमिसिंग यंग वुमन)

बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म- अनदर राउंड

बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट- कोलेट

बेस्ट अडैप्टेड स्क्रीनप्ले- Christopher Hampton, Florian Zeller (द फादर)

बेस्ट मेकअप एंड हेयरस्टाइलिंग- Sergio Lopez-Rivera, Mia Neal, Jamika Wilson (मा रेनीज ब्लैक बॉटम)

बेस्ट कॉस्टयूम- चैडविक बोसमैन आणि Viola Davis (मा रेनीज ब्लैक बॉटम)

दरम्यान ऑस्कर 2021 पुरस्कार सोहळ्यात दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खान ज्याने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या छाप सोडली त्याच्यासह सुशांत सिंह राजपूत, ऋषी कपूर, भानू अथिया आणि अनेक दिवंगत स्टार्संना श्रद्धांजली वाहिली.