रिहाना आणि भारतीय क्रिकेटर प्रज्ञान ओझा (Photo Credit: Twitter)

देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmer Protest India) आता आंतरराष्ट्रीय स्टारने उडी घेतली आहे. हॉलिवूड स्टार रिहानाने (Rihanna) 2 फेब्रुवारी रोजी रात्री भारतात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट केले ज्यामुळे सोशल मीडियावर वादाला सुरुवात झाली आहे. रिहानाने एका अहवालाचा दुवा शेअर करत आंदोलनादरम्यान इंटरनेट सेवा बंद केल्यावर प्रश्न उपस्थित केला. या विषयावर रेहानाने ट्विट करताच सोशल मीडियावर खळबळ उडाली असून या ट्विटनंतर रेहाना भारतातील टॉप ट्विटर ट्रेंड बनली आहे. कोणी याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहे तर कोणी रिहानाचे कौतुक करीत आहे. बऱ्याच मोठ्या भारतीय स्टार्सनेही रेहानाला पाठिंबा दर्शविला तर काहींनी म्हटले की ही भारताचे अंतर्गत प्रकरण आहे, यात हस्तक्षेप करू नये. माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने (Pragyan Ojha) रिहानाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत तिला हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला. (Farmers’ Protest: 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत देशभरात 'चक्का जाम', आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची घोषणा)

ओझाने ट्विट करत म्हटले की, "माझ्या देशाला आमच्या शेतकऱ्यांचा अभिमान आहे आणि ते किती महत्वाचे आहेत हे आम्हाला माहिती आहे, मला विश्वास आहे की लवकरच हे प्रकरण मार्गी लागेल. आमच्या अंतर्गत प्रकरणात बाहेरील व्यक्तीला नाक खुपसण्याची गरज नाही." शेतकरी आणि पोलिस यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर हरियाणाच्या अनेक जिल्ह्यांत इंटरनेटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे.

दरम्यान, इंग्लंडच्या मोंटी पनेसर या दुसर्‍या माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने रिहानाला मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे. “शनिवारी भारतातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दल बोलण्यासाठी माझ्या" The Full Monty "या कार्यक्रमाच्या @panjabradio_ @AsianFXRadio ची आपली मुलाखत घेण्यात आनंद होईल,″ पनेसरने ट्विटरवर म्हटले.

32 वर्षीय रिहाना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी आंतरराष्ट्रीय स्तराची पहिली स्टार आहे. ट्विटरवर रिहानाचे 100 करोडहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तिचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर जबरदस्त हंगाम झाला त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर केवळ सुरक्षा अधिक कडक केली गेली, तर निषेधाच्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.