Christian Oliver Killed In Plane Crash: प्रसिद्ध अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर आणि त्याच्या 2 मुलींचा विमान अपघातात मृत्यू, Watch Video
Christian Oliver (फोटो सौजन्य - Instagram)

Christian Oliver Killed In Plane Crash: पूर्व कॅरिबियनमधील एका बेटाजवळ झालेल्या विमान अपघातात (Plane Crash) अमेरिकन अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर (Christian Oliver) आणि त्याच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी विमान जवळच्या सेंट लुसियाकडे जात असताना बेकियाजवळील पेटिट नेव्हिस बेटाच्या अगदी पश्चिमेस हा अपघात झाला. त्यांनी मुलींची ओळख 10 वर्षांची मदिता क्लेपसर आणि 12 वर्षांची ऍनिक क्लेपसर अशी केली. याशिवाय विमानाचा पायलट रॉबर्ट सॅक्सचाही अपघातात मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

विमानाने एफ मिशेल विमानतळावरून सेंट लुसियाच्या मार्गावर उड्डाण केले. मात्र, टेक ऑफ करताच विमानात काहीतरी बिघाड झाला. मात्र, विमान पुढे गेले आणि काही अंतरावर गेल्यावर ते कोसळले व पाण्यात पडले. यावेळी उपस्थित लोकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र कोणालाही वाचवता आले नाही. वैमानिक रॉबर्ट सॅक्ससह चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. (हेही वाचा -Glynis Johns Passes Away: मेरी पॉपिन्सची अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स यांचे निधन; 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स कोस्ट गार्डने परिसरात हलवल्यामुळे परिसरातील मच्छीमार आणि गोताखोरांनी अपघाताच्या ठिकाणी मदतीसाठी धाव घेतली. मच्छीमार आणि गोताखोरांच्या निस्वार्थ आणि धाडसी कृतीचे पोलिसांनी कौतुक केलं. (हेही वाचा - Lee Sun-Kyun Found Dead: ऑस्कर विजेता 'पॅरासाइट' अभिनेता ली सन-क्युन यांचे निधन, कारमध्ये आढळला मृतदेह)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, 51 वर्षीय जर्मन वंशाच्या अभिनेत्याने अनेक प्रशंसित चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. ज्यामध्ये 2008 मध्ये आलेला 'स्पीड रेसर' आणि 'द गुड जर्मन' या चित्रपटाचा समावेश आहे.