Glynis Johns Passes Away: मेरी पॉपिन्सची अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स यांचे निधन; 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Glynis Johns (PC- Twitter/@ScottGustin)

Glynis Johns Passes Away: 'मेरी पॉपिन्स' (Mary Poppins) मधील विनिफ्रेड बँक्सच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली ब्रिटिश अभिनेत्री ग्लिनिस जॉन्स (Glynis Johns) यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. जॉन्सचा मृत्यू लॉस एंजेलिसमधील राहत्या घरी नैसर्गिक कारणांमुळे झाला. जॉन्सने 1938 मध्ये किशोरवयात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 60 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करून जॉन्सने 'व्हाईल यू वेअर स्लीपिंग आणि 'द सनडाउनर्स साठी ऑस्कर नामांकन देखील मिळवले. ग्लिनिसने बुद्धिमत्ता आणि अभिनयाच्या जोरावर आयुष्यभर प्रेक्षकांची मनं जिंकली.

ग्लिनिस जॉन्स च्या पश्चात तिचा नातू, थॉमस फॉरवुड आणि तीन नातवंडे आहेत. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, युनायटेड किंगडममध्ये तिचे वडील, अभिनेता मर्विन जॉन्स यांच्या शेजारी त्यांचे दफन केले जाईल. तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देताना, तिचे व्यवस्थापक मिच क्लेम यांनी हा दिवस हॉलीवूडसाठी अत्यंत वाईट असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, ग्लिनिसने बुद्धीमत्ता आणि कार्यप्रदर्शनावरील प्रेमाने तिच्या जीवनाचा मार्ग सामर्थ्यवान केला, ज्यामुळे लाखो जीवनावर परिणाम झाला. आजचा दिवस हॉलीवूडसाठी दुःखदायक आहे. (हेही वाचा - Lee Sun-Kyun Found Dead: ऑस्कर विजेता 'पॅरासाइट' अभिनेता ली सन-क्युन यांचे निधन, कारमध्ये आढळला मृतदेह)

ग्लिनिस जॉन्स ही एक लोकप्रिय अभिनेत्री होती, जिची कारकीर्द 60 वर्षांपेक्षा जास्त काळ होती. स्टीफन सोंधेमच्या 'अ लिटिल नाईट म्युझिक' या ब्रॉडवे म्युझिकलमध्ये तिने डेझीरी आर्मफेल्डची भूमिका साकारल्यानंतर तिला 1973 मध्ये टोनी पुरस्कार मिळाला. तिने या प्रोजेक्टमध्ये 'सेंड इन द क्लाउन्स' हे गाणं गायलं. हेही वाचा, Oscars 2020: ‘पैरासाइट’ठरला ऑस्कर विजेता सर्वोत्कृष्ट चित्रपट,वॉकिन फीनिक्स बेस्ट अॅक्टर)

जॉन्सचा जन्म 5 ऑक्टोबर 1923 रोजी दक्षिण आफ्रिकेत झाला. 1960 मध्ये 'द सनडाउनर्स' मधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी ऑस्करमध्ये नामांकन देखील मिळाले होते. ब्रिटीश अभिनेत्रीने अनुक्रमे अँथनी फोरवुड, डेव्हिड रॅमसे फॉस्टर, सेसिल हेंडरसन आणि इलियट अरनॉल्ड यांच्याशी लग्न केले. परंतु, तिचा वेगवेगळ्या कारणांमुळे या चौघांसोबत घटस्फोट झाला. सध्या, त्याच्या पश्चात फॉरवुडचा एक मुलगा गॅरेथ आहे.