‘पैरासाइट’ चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार खेचून आणत इतिहास घडवला आहे. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका नॉन-इंग्लिश चित्रपटास ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. ‘पैरासाइट’ नावाच्या एका दक्षिण कोरियन चित्रपटास ऑस्कर मिळाल्याने जभरातील चित्रपट समिक्षक आणि अभ्यासकांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ‘जोकर’ चित्रपटासाठी वॉकिन फीनिक्स याला उत्कृष्ट अभिनेता तर, ‘जूडी’ चित्रपटासाठी रिनी जैलवेगर हिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऑस्कर मिळाला आहे. बॉन्ग जून यांना ‘पैरासाइट’ चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ऑस्कर मिळाला आहे. अमेरिकेच्या कैलिफोर्निया प्रदेशात असणाऱ्या लॉस एंजेलिस शहरात यंदाचा ऑस्कर २०२० (Oscars 2020) सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लॉस एंजिलिस शहरातील डॉल्बी थिएटर येथे पार पडलेल्या या सोहळ्याचे यंदा 92 वे वर्ष होते. हा कार्यक्रम आणि पुरस्काराबद्दल जगभरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर जगभरातील चित्रपट समिक्षक आणि अभ्यासकांच्या दाव्यांना धक्का देत विवध चित्रपटांना पुरस्कार मिळाले.
ऑस्कर 2020 मध्ये कोणाला काय मिळाले.
दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे प्रोडक्शन निर्मित असलेल्या ‘अमेरिकन फैक्ट्री’ साठी उत्कृष्ठ डॉक्यूमेंट्री अवार्ड मिळाला.‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलीवुड’ चित्रपटासाठी ब्रेड पिट याला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला.‘मैरिज स्टोरी’ चित्रपटासाठी अभिनेत्री लॉरा डर्न हिला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विभागात पुरस्कार तर, चित्रपट ‘रॉकेटमैन’ च्या 'आय एम गोना लव मी अगेन' गाण्यासाठी एल्टन जॉन याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग पुरस्कार जाहीर झाला.‘जोकर’ चित्रपटासाठी हिल्डर गुड्नाडोटिर को बेस्ट ओरिजिनल स्कोर पुरस्कार मिळाला. बेस्ट मेकअप आणि हेयरस्टाइल अवॉर्ड ‘बॉम्बशैल’ चित्रपटासाठी काजू हिरो, एने मॉर्गन आणि विवियन बेकर यांना मिळाला. वॉर एपिक ‘1917’ ने बेस्ट विजुअल इफेक्ट्स अवॉर्ड जिंकला. 'फोर्ड v फरारी' चित्रपटासाठी माइकल मॅकस्कर आणि एंड्रयू बकलैंड यांनी बेस्ट फिल्म एडिटिंग पुरस्कार जिंकला.
‘1917’साठी रॉजर डीकिंस याला बेस्ट सिनेमेटोग्राफी अवॉर्ड मिळाला. बेस्ट स्क्रीन प्ले अवॉर्ड डायरेक्टर बॉन्ग जून यांना मिळाला. परंतू, त्यांनी हा पुरस्कार कोरियन फिल्म ‘पैरासाइट’साठी दिला. एडाप्टेड स्क्रीनप्ले विभागात ‘जोजो रैबिट’ चित्रपटासाठी ताइका वतीती यांची निवड करण्यात आली. ‘टॉय स्टोरी 4’ बेस्ट एनिमेटेड चित्रपट ठरला. तर, बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म साठीचा पुरस्कार‘हेयर लव’साठी देण्यात आला. ‘हेयर लव’च्या दिग्दर्शिका डायरेक्टर मैथ्यू चैरी यांनी हा अवॉर्ड दिवंगत कोबे ब्रायंट यांना अर्पण केला. यांदाचा बेस्ट लाइव एक्शन शॉर्ट फिल्म ‘द नेबर्स विंडो’हा ठरला. (हेही वाचा, Academy Awards 2020: अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या The Last Color चित्रपटास ऑस्कर नामांकन)
ऑस्कर 2020 संपूर्ण तपशील देणारे एएनआय ट्विट
Here's the complete list of 2020 Oscar winners
Read @ANI Story | https://t.co/X9Nd7ro707 pic.twitter.com/QlRlFqH4SC
— ANI Digital (@ani_digital) February 10, 2020
काय आहे ऑस्कर पुरस्कार?
ऑस्कर पुरस्कार हे अमेरिकास्थित एॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर ऑर्ट्स अॅण्ड सायंन्सेस (AMPAS) द्वारा दिले जातात. काही लोक याला एॅकेडमी पुरस्कारही म्हटले जाते. जगभरातील चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांना हे पुरस्कार दिले जातात. मनोरंजन विश्वात या पुरस्कारांना अत्यंत मानाचे स्थान आहे. जभरातील चित्रपटप्रेमी आणि चित्रपटसृष्टीत प्रत्यक्ष काम करणारे कलाकार या पुरस्कारांकडे डोळे लाऊन असतात. पहिला ऑस्कर पुरस्कार 1929 मध्ये देण्यात आले. हा पुरस्कार सोहळा त्या वर्षी (1929) 16 मे या दिवशी प्रदान करण्यात आले होते.