अजय देवगण (Ajay Devgn) आणि सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) 'तानाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच अजय देवगणने सोशल मीडियावर शेयर केला आहे. जेव्हापासून हा चित्रपट घोषित करण्यात आला आहे, तेव्हापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. तानाजी मालुसरे यांची शौर्य गाथा उलगडणाऱ्या या चित्रपटात अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान उदयभानची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. अजय देवगणने आपल्या ट्विटरवर चित्रपटाची पहिली झलक शेयर केली आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाचं नाव हे रक्ताळलेल्या लाल रंगामध्ये लिहिण्यात आले आहे.
पाहा फर्स्ट लुक:
#TheUnsungWarrior@itskajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @ADFFilms_ @Tseries #KrishanKumar pic.twitter.com/DHLHCzzdwQ
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 20, 2019
'तानाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक ओम राऊत याने केले आहे. याआधी त्याने सुबोध भावेने (Subodh Bhave) साकारलेल्या 'लोकमान्य'चे दिग्दर्शन केले होते. सध्या चित्रपटसृष्टीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची संख्या वाढत चालली आहे. त्यातसुद्धा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या कथा जास्त आहेत. तानाजीसोबतच पानिपतच्या लढाईवर 'पानिपत' हा चित्रपट येतो आहे. आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्येही 'फर्जंद' नंतर आता 'फत्तेशिकस्त' आणि 'हिरकणी' येऊ घातले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट रसिका साठी हा सुवर्ण आणि अभिमानाचा काळ म्हणता येईल.