Dadasaheb Phalke Birth Anniversary: दादासाहेब फाळके यांच्या 151 व्या जयंतीच्या निमित्त फिल्म्स डिव्हिजन करणार त्यांच्या चरित्रपटांचे प्रसारण

29 आणि 30 एप्रिल,2021 रोजी माहितीपट आणि अ‍ॅनिमेशन चित्रपटांचा दोन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला असून या मध्ये रंगभूमी, द पी प्लांट लीगसी,ड्रीम टेक्स विंग्ज हे 3 सिनेमे दाखवले जाणार आहेत.

Close
Search

Dadasaheb Phalke Birth Anniversary: दादासाहेब फाळके यांच्या 151 व्या जयंतीच्या निमित्त फिल्म्स डिव्हिजन करणार त्यांच्या चरित्रपटांचे प्रसारण

29 आणि 30 एप्रिल,2021 रोजी माहितीपट आणि अ‍ॅनिमेशन चित्रपटांचा दोन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला असून या मध्ये रंगभूमी, द पी प्लांट लीगसी,ड्रीम टेक्स विंग्ज हे 3 सिनेमे दाखवले जाणार आहेत.

मनोरंजन टीम लेटेस्टली|
Dadasaheb Phalke Birth Anniversary: दादासाहेब फाळके यांच्या 151 व्या जयंतीच्या निमित्त फिल्म्स डिव्हिजन करणार त्यांच्या चरित्रपटांचे प्रसारण
Dadasaheb Phalke (Photo Credit: Twitter)

धुंडिराज गोविंद फाळके उर्फ ‘दादासाहेब फाळके’ (Dadasaheb Phalke (1870 -1944) म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुंडिराज गोविंद फाळके यांनी भारताला चित्रपटकलेची ओळख करून दिली आणि देशवासीयांसमोर अमर्याद कल्पनेचे द्वार खुले करून दिले. त्यांच्या दूरदर्शी आकांक्षेमुळे, आजच्या भरभराट झालेल्या भारतीय करमणूक उद्योगाची आधारशीला बलवान‌ झाली.30 एप्रिल 2021 रोजी भारतीय सिनेमाचे जनक म्हणून ओळखल्या जाणार्‍या या आख्यायिकेला, त्यांच्या 151व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी फिल्म डिव्हिजन, दिनांक 29 आणि 30 एप्रिल,2021 रोजी माहितीपट आणि अ‍ॅनिमेशन चित्रपटांचा दोन दिवसीय महोत्सव आयोजित करीत आहे. हे माहितीपट फिल्म्स डिव्हिजनच्या https://filmsdivision.org/ आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision या संकेतस्थळांवरून प्रदर्शित केले जातील.

एफडी चे संकेतस्थळ आणि यू ट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांत खालील चित्रपटांचा समावेश आहे.

  • ड्रीम टेक्स विंग्ज

(16 मिनिटे / इंग्रजी / 1972 / गजानन जागीरदार )- दादासाहेब फाळके यांच्यावरील चरीत्रपट, फाळके चिल्ड्रन (20 मिनिटे / इंग्लिश / 1994 / कमल स्वरूप) -फाळकेंवरील चरीत्रपट ज्यात त्यांच्या हयात असलेल्या मुलांच्या आणि कौटुंबिक छायाचित्रांच्या अंशाच्या आठवणीतून त्यांचे जीवन आणि कार्य यांचा मागोवा घेणारा चित्रपट.

  • द पी प्लांट लीगसी

(11 मिनिटे / संगीत / 2015 / राम मोहन) - दादासाहेब फाळके यांच्यावरील अँनिमेशन पट,आणि ट्रेसिंग फाळके (102 मिनिटे / इंग्रजी /2015 / कमल स्वरूप)- एक अ‍ॅनिमेशन चित्रपट - फाळके जिथे रहात असत आणि त्या ठिकाणी रहाणाऱ्या ज्या लोकांसह कार्य करत असत, त्या ठिकाणांचा मागोवा घेत ,त्यांच्या आयुष्याची कथा सांगण्याचा प्रयत्न चित्रीत करणारा चित्रपट.

  • रंगभूमी

( 90 मिनिटे / हिंदी / 2013 / कमल स्वरूप) - काही कल्पित काही सत्य आणि माहितीयांचे मिश्रण असलेला , फाळकेंच्या वाराणसीतील जीवनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणारा एक माहितीपट ,ज्यात त्यांनी भ्रमनिरास होऊन सिनेमाच्या दुनियेतून माघार घेतली, आणि रंगभूमी सुरू करण्याचा निर्णय घेतला,त्या विषयीचा हाा चित्रपट आहे.

दादासाहेब फाळकेंनी 1913 साली राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट बनवला. हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होता. 1937 पर्यंतच्या आपल्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 95 चित्रपटांची व 26 लघुपटांची निर्मिती केली.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change