Coronavirus: ढिंच्याक पूजा हिचे Hoga Na Corona गाणे सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)
Dhinchak Pooja Song on Coronavirus (Photo Credits-YouTube)

सोशल मीडियात नेहमीच गाण्यांमुळे ट्रोल करण्यात येणाऱ्या ढिंच्याक पूजा हिचे आता एक नवे गाणे आहे. तर देशातील कोरोनाची स्थिती पाहता ढिंच्याक पूजा हिने कोरोनावर एक गाणे युट्युबर पोस्ट केले आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासाच त्याला लाखो लोकांनी पाहिले आहे. 'होगा ना कोरोना' असे गाण्याचे नाव असून सोशल मीडियात खुप व्हायरल होत आहे. या दोन मिनिटांच्या व्हिडिओतून पूजा हिने नागरिकांना कोरोना व्हायरसपासून कसा बचाव कराल याबाबत सांगितले आहे. तसेच नागरिकांना हा आजार होऊ नये यासाठी सुद्धा प्रार्थना केली आहे.

यापूर्वी ढिंच्याक पूजा हिने दिलो का शूटर, बापू दे दे थोडा कॅश सारखे गाणे म्हणत सोशल मीडियात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता कोरोनाचे गाणे प्रदर्शित करुन नागरिकांना त्यामधून जनजागृतीचा संदेश देत आहे. पण सोशल मीडियात ढिंच्याक पूजा हिने होगा ना कोरोना गाणे ऐकल्यानंतर मिम्सचा पाऊस सुद्धा तितकाच पडला आहे जेवढा तिच्या गाण्याला व्युज मिळाले आहेत. तर पहा ढिंच्याक पूजा हिचे होगा ना कोरोना गाण्याचा व्हिडिओ.(मोठ्या प्रतीक्षेनंतर ढिंच्याक पूजा चे नवे गाणे चाहत्यांच्या भेटीला; सोशल मिडीयावर कमेंट्सचा पाऊस Video)

ढिंच्याक पूजा हिच्या होगा ना कोरोना गाण्यानंतर सोशल मीडियात मीम्सचा पाऊस

Tweet:

Tweet:

ढिंच्याक पूजा  नावाची एक लाट भारतात आली आहे. स्वतःला गायिका म्हणवणाऱ्या या तरुणीने स्वतःच्या गाण्यांच्या जोरावर चक्क बिग बॉसपर्यंत मजल मारली होती. ‘सेल्फी मैने लेली यार’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या पुजाला आपल्या गाण्यांमुळे अनेक लोकांच्या टीकेचाही सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा पूजा आपल्या नव्या गाण्यासह रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.