Naach ke Pagal (संग्रहित संपादित प्रतिमा)

काही दिवसांपूर्वी ढिंच्याक पूजा (Dhinchak Pooja) नावाची एक लाट भारतात आली होती. स्वतःला गायिका म्हणवणाऱ्या या तरुणीने स्वतःच्या गाण्यांच्या जोरावर चक्क बिग बॉसपर्यंत मजल मारली होती. ‘सेल्फी मैने लेली यार’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या पुजाला आपल्या गाण्यांमुळे अनेक लोकांच्या टीकेचाही सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा पूजा आपल्या नव्या गाण्यासह रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘नाच के पागल’ (Naach ke Pagal) असे या गाण्याचे नाव असून, सध्या सोशल मिडीयावर हे गाणे धुमाकूळ घालत आहे.

नेहमीप्रमाणे या गाण्यातही पूजाच्या डान्सचा एक खास अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र सर्वात मोठी ट्रिट असणार आहे ती तिच्या सोबत डान्स करणाऱ्या इतर कलाकारांची. पूजाने यावेळी आपल्या गाण्यात विविध वेगवेगळ्या लोकांना नाचायला भाग पडले आहे. यामध्ये एक भूतही पुजासोबत नाचताना दिसत आहे. मात्र अनेकांनी हे भयंकर गाणे स्वतःच्या हिमतीवर पहा असा सल्ला दिला आहे. (हेही वाचा: ढिंच्याक पूजा हीच्या चाहत्यांना नवी ट्रिट; ‘नाचे जब कुडी दिल्ली दी’ गाणे प्रदर्शित)

कलाकाराने काय करावे यापेक्षा काय करू नये याचे हे गाणे एक महत्वाचे उदाहरण आहे. पूजाच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणेदेखील फार विनोदी ढंगात चित्रित झाले असून, लोकांनी याची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. युट्यूबवर सध्या पूजाचे 4.69 लाख चाहते आहेत, व हे गाणे आतापर्यंत 16 लाख पेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे.