Dhinchak Pooja New Song (Photo Credits : Youtube)

आपल्या हटके स्टाईलच्या गाण्यांमुळे लोकप्रिय असलेली ढिंच्याक पूजाचे (Dhinchak Pooja) नवे गाणे 'नाचे जब कुडी दिल्ली दी' (Nache Jab Kudi Dilli Di) अलिकडेच प्रदर्शित झाले आहे. तिच्या प्रत्येक गाण्याप्रमाणे हे ही गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. गाण्यात पूजाने एका पंजाबी डान्स ग्रुपसोबत ठेका धरला आहे. या गाण्याला युट्युबवर सुमारे 140000 व्ह्युज मिळाले आहेत.

हे गाणे ढिंच्याक पूजाने लिहिले असून संगीतबद्धही तिनेच केले आहे. इतकंच नाही तर व्हिडिओचे दिग्दर्शन-निर्मितीची धुराही तिनेच सांभाळली आहे. (दहा ते एक अंक मोजा आणि ढिंच्याक पूजाचे नवे गाणे पाहा)

पाहा ढिंच्याक पूजाचे नवे गाणे:

यापूर्वी ढिंच्याक पूजाची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली. यात 'सेल्फी मैंने लेली आज,' 'स्वॅग मेरा स्टाईल' आणि 'दिलों का शूटर हैं मेरा स्कुटर' या गाण्यांचा समावेश आहे. बिग बॉस 11 च्या सीजनमध्येही पूजा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरातही तिला गाणं निर्मितीचा मोह आवरता आला नव्हता.