ढिंच्याक पूजा (Photo Credits : Youtube)

काही दिवसांपूर्वी ढिंच्याक पूजा नावाची एक लाट भारतात आली होती. स्वतःला गायिका म्हणवणाऱ्या या तरुणीने स्वतःच्या गाण्यांच्या जोरावर चक्क बिग बॉसपर्यंत मजल मारली होती. ‘सेल्फी मैने लेली यार’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या पुजाला आपल्या गाण्यांमुळे अनेक लोकांच्या टीकेचाही सामना करावा लागला होता. मात्र लोकांच्या कमेंट्सना न घाबरता पूजाने गाणी बनवणे चालूच ठेवले. आता पुन्हा एकदा पूजा नव्या जोमाने लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नवीन गाणे घेऊन आली आहे. पूजाच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणेदेखील फार विनोदी ढंगात चित्रित झाले असून, अल्पावधीतच हे गाणे सोशल मिडियावर अतिशय व्हायरल झाले आहे.

‘स्वॅग मेरा स्टाईल है’ असे या गाण्याचे बोल असून, पुन्हा एकदा पूजा एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. या गाण्यामध्ये पूजा विविध लोकेशन्सवर नृत्य करताना दिसून येत आहे. एका विशिष्ठ पद्धतीने स्वतःचे शरीर आणि हात हलवून केले जाणारे नृत्य ही पुजाची स्टाईल या गाण्यामध्येही दिसून येते.  या गाण्याचे अजून एक वैशिष्ट म्हणजे या गाण्यामध्ये पूजा चक्क किकी चॅलेंज साकारताना दिसत आहे

या गाण्याला आत्तापर्यंत दीड लाखापेक्षा जास्त व्हीव्युज मिळालेल्या असून, पूजाच्या इतर गाण्याप्रमाणेच हे गाणे लोकांच्या चर्चेचा आणि कमेंट्सचा विषय बनत आहे.