Happy Diwali 2019; काय आहेत Star Pravah च्या कलाकारांचे यंदाचे दिवाळी Plans
Star Pravah Actors (Instagram)

दिवाळी आली की काय करू आणि काय नको असं सगळ्यांनाच होतं. कलाकारही काही वेगळे नसतात. जाणून घेऊ स्टार प्रवाहचे (Star Pravah) कलाकार यंदा कशी साजरी करणार दिवाळी. काय आहेत त्यांचे प्लॅन्स. 

हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar)

यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. कारण यंदा दिवाळीत माझी स्टार प्रवाहवर ‘रंग माझा वेगळा’ ही नवी मालिका सुरु होतेय. त्यामुळे डबल सेलिब्रेशन आहे. खरं सांगायचं तर दिवाळीच्या खूप कडू गोड आठवणी आहेत. दिवाळीतच माझं वडिलांचं छत्र हरपलं. त्यांना जाऊन 18 वर्ष होतील. पण वडिलांची कमतरता माझा भाचा कुशलने भरुन काढली. गेली 17 वर्ष तो माझ्या आयुष्यात नवनवे रंग भरतो आहे. दिवाळीच्या फराळात माझी फारशी मदत नसली तरी माझी आई उत्तम फराळ बनवते. आणि मी उत्तम खवय्यी असल्यामुळे त्यावर मनसोक्त ताव मारते. दिवाळीत कुटुंबासमवेत घालवलेला वेळ वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जातो असं मला वाटतं

विशाल निकम (Vishal Nikam)

‘साता जल्माच्या गाठी’ मालिकेतील युवराज म्हणजेच विशाल निकम मुळचा सांगलीचा. घरचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे घरात दिवाळी सणाचं खूप महत्त्व आहे. माझ्या घरी दिवाळीच्या पहिल्या दिवशी शेणापासून बळीराजाची मूर्ती तयार करुन त्याची पुजा केली जाते. लहानपणी आम्ही सर्व मुलं एकत्र येऊन किल्ला बनवत असू. महिनाभर आधापासून आम्ही मुलं तयारी करायचो. मातीपासून बनवलेला किल्ला, शिवाजी महाराज आणि मावळे यांचा थाट काही औरच असायचा. माझ्यामते दिवाळी सणाचा आनंद इतरांसोबत वाटण्यात खरी मजा आहे. यंदा गरजुंना खाऊ आणि कपडे वाटप करुन दिवाळी सण साजरा करणार आहे. (हेही वाचा. Diwali ला चाहत्यांसाठी खास पर्वणी; हे चित्रपट होणार Box Office वर आज Release)

एकता लब्दे (Ekta Labde)

'विठुमाऊली’ मालिकेतील रखुमाई म्हणजेच एकता लब्देचा आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सहकुटुंब सिद्धीविनायकाचं दर्शन घेणं हे मी नित्यनेमाने करते. दिवाळीची चाहूल लागली की घरातल्या साफसफाईपासून ते अगदी फराळापर्यंत प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग असायचा. शूटिंगमुळे आता ते शक्य होत नाही. पण यंदाच्या दिवाळीत वर्षभरात न भेटलेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना मी आवर्जून भेटणार आहे.

मंदार जाधव (Mandar Jadhav)

दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे. दिवाळीचा सगळा फराळ घरीच बनतो. रात्रभर जागून आम्ही सहकुटुंब तो बनवतो. एकत्र फराळ बनवण्यात आणि तो फस्त करण्यात वेगळीच मजा आहे. मला रांगोळी काढायलाही खूप आवडतं. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत आवर्जून रांगोळी काढतो. सणाच्या निमित्ताने नातलगांशी होणाऱ्या भेटीगाठी, भेटवस्तूंची देवाण-घेवाण जगण्याला नवी उभारी देतात असं मला वाटतं. यंदा दिवाळीच्या शुभदिनी ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेत श्री दत्त आणि अनघा देवी यांच्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. मालिकेतलं हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

तुमचेही असेच काही प्लॅन्स असतील, तर आम्हालाही कळवा. आणि दिवाळीत भरपूर मजा करा.