
बॉलिवूड कलाकार जरीन खान (Zareen Khan) हिने शनिवारी इन्स्टाग्रावर (Instagram) तिचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये जरीन हिच्या पोटावरील स्ट्रेचमार्क (Stretch Marks) दिसून आल्याने नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. या प्रकारावर अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने जरीन खान हिचा पाठवपुरावा केला आहे. तसेत जरीन हिने सुद्धा पोटावरील स्ट्रेचमार्क दिसण्याचे मुख्य कारण काय याचे स्पष्टीकरण इन्स्टाग्रामवरुन नेटकऱ्यांना दिले आहे.
अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एका स्टोरितील पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, जरीन तु जशी आहेस फारच सुंदर आणि बहादूर असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तर जरीन हिने सुद्धा सोशल मीडियात फोटोवरुन ट्रोल करण्यात आलेल्यांना प्रतिउत्तर दिले आहे. यामध्ये तिने असे म्हटले आहे की, मला माझ्यामधील कमतरता झाकून ठेवण्यापेक्षा त्या गोष्टी मी गर्वाने करु शकते. यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचे ही जरीन हिने म्हटले आहे.(सलमान खान माझ्याशी लग्न करत आहे म्हणणाऱ्या अभिनेत्री जरीन खान हिची सोशल मीडियात चर्चा, वाचा सविस्तर)
तसेच जरीन हिने पोटावरील स्टेचमार्क हे वजन कमी केल्यामुळे आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे ज्या फोटोला ट्रोल केले आहे तो फोटोशॉप किंवा सर्जरी न केल्यास ते असेच दिसणार असे ही उत्तरात म्हटले आहे.

जरीन हिच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास लवकरच ती 'हम भी अकेले तुम भी अकेले' या चित्रपटामधून झळकणार आहे. तसेच अनुष्का सुद्धा शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्यासोबत 'झीरो' चित्रपटामधून झळकली होती.