विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credit: Twitter)

बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने चित्रपट निर्माती झाल्यानंतर आता वेब सीरिजची देखील निर्माती बनली आहे. बॉलिवूड मधील 'NH 10' या चित्रपटाच्या निर्माती म्हणून धुरा सांभाळल्यानंतर आता अनुष्काने 'पाताल लोक' (Paatal Lok) या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. 15 मे अॅमेझॉन प्राईम वर हा वेबसीरिज प्रदर्शित झाली आणि काही क्षणातच संपूर्ण देशाला या वेब सीरिजने भुरळ पाडली. ही वेब सीरिज सुपरहिट झाली असून सोशल मिडियाच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातील कलाकारांसह अनुष्का शर्माचेही सर्व कौतुक करत आहेत. मग यात अनुष्काची पती विराट कोहली (Virat Kohli) कसा मागे राहील.

ही वेब सीरिज पाहिल्यानंतर विराट ने सोशल मिडियाच्या माध्यमातून पाताल लोक च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर आपल्या बायकोचे म्हणजेच अनुष्काचेही विशेष कौतुक केले आहे.

हेदेखील वाचा- Paatal Lok Full Series in HD Leaked: अनुष्का शर्माची वेब सीरिज 'पाताल लोक' झाली लीक?

वाचा काय म्हणाला विराट कोहली

"पाताल लोक ही वेब सीरीज मी खूप आधीच पाहिली होती. तेव्हाय मी अंदाज बांधला होता की ही एक उत्कृष्ट वेब सीरिज म्हणून सिद्ध होईल. याची कथा, स्क्रीन प्ले आणि अभिनयाचे उत्कृष्ट मिश्रण आहे. सर्वांचे काम खूपच उत्कृष्ट आहे असे विराट कोहलीने म्हटले असून मी माझ्या लाडक्या अनुष्कावर प्रचंड खूश आहे जिने अशी वेबसीरिजची निर्मिती आहे." त्याचबरोबर आपला मेहुणा कारनेश शर्माचे सुद्धा आभार मानले आहे.

पाताल लोक ही वेब सीरिज प्रदर्शित होताच लोकांनी याला प्रचंड पसंत केले असून अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले आहे. या वेबसीरिज मधील सर्व कलाकारांचे काम सुंदर असून अनुष्का शर्माने उत्कृष्ट निर्मिती केली आहे. मात्र यात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती अभिनेता जयदीप अहलावत. याने या शो मध्ये एका पोलिसाची भूमिका साकारली आहे.