Vibhu Agrawal, the CEO of film production company Ullu Digital Pvt Ltd (Photo: Agrawal's Twitter handle)

बॉलिवूड चित्रपट निर्माते विभू अग्रवाल (Vibhu Agarwal) अडचणीत सापडले आहेत. नुकतेच मुंबई पोलिसांनी विभू अग्रवालविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या निर्मात्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा (Molestation) गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विभू अग्रवाल यांच्या प्रोडक्शन कंपनीचे नाव ‘उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड’ (Ullu Digital Private Limited) आहे. अडल्ट कंटेंट तयार करण्यासाठी ही कंपनी बरीच प्रसिद्ध आहे. अशा स्थितीत एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप करत विभू अग्रवाल आणि त्यांच्या कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैना यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलिसांनी यासंदर्भात म्हटले आहे- 'फिल्म प्रोडक्शन कंपनी उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ विभू अग्रवाल यांच्याविरोधात मुंबईत आयपीसीच्या कलम 354 अंतर्गत एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विभू अग्रवाल यांच्यासह त्यांच्या कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैनावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’

बातमीनुसार, या प्रकरणी विभू अग्रवालला अटक करण्यात आली आहे. मात्र, अटकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. म्हणून आम्ही याची पुष्टी करत नाही. (हेही वाचा: Honey Singh च्या पत्नीचे सासऱ्यांवर गंभीर आरोप- 'मी कपडे बदलत असताना ते खोलीत शिरले व त्यांनी माझ्या स्तनांवरून हात फिरवला')

2013 मध्ये विभू अग्रवाल यांनी 'बात बन गई' या बॉलिवूड चित्रपटाची निर्मिती केली. यानंतर त्यांनी 2018 मध्ये उल्लू अॅप लाँच केले. या ठिकाणी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भोजपुरी, बंगाली, पंजाबी, मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि गुजराती भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित केले जातात. हे अॅप बोल्ड कंटेंटसाठी प्रसिद्ध आहे. याआधी विभू यांनी आपल्या अॅपबाबत म्हणाले होते की आम्हाला ‘उल्लू’बद्दल लोकांची धारणा बदलायची आहे. म्हणूनच आम्ही ठरवले आहे की अॅपवरील 60 टक्के कंटेंट हा कौटुंबिक असेल.