Honey Singh च्या पत्नीचे सासऱ्यांवर गंभीर आरोप- 'मी कपडे बदलत असताना ते खोलीत शिरले व त्यांनी माझ्या स्तनांवरून हात फिरवला'
Honey Singh (Photo Credits: Getty Images)

गायक हनी सिंग (Yo Yo Honey Singh) त्याच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतो. पण आजकाल तो एका वेगळ्याच वादात अडकला आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे (Domestic Violence) गंभीर आरोप केले आहेत. शालिनी तलवार हिने हनी सिंगवर शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांत शालिनी तलवारने हनी सिंगबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत आणि त्याच्या कुटुंबावरही आरोपही केले आहेत. शालिनीने आता तिच्या सासऱ्याबद्दल असा दावा केला आहे, जो ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.

शालिनीने तिचे सासरे सरदार सरबजीत सिंग यांच्याबद्दल आरोप केला आहे की, एक दिवस जेव्हा ती खोलीत कपडे बदलत होती, तेव्हा सासरे दारूच्या नासेह्त तिच्या खोलीत शिरले. एवढेच नाही तर शालिनीच्या म्हणण्यानुसार, सासऱ्यांनी नात्याला काळिमा फासत आपल्या सुनेच्या स्तनांवरून हात फिरवला. याशिवाय, शालिनीने खुलासा केला की हनी सिंगचे इतर महिलांशीही संबंध होते आणि तो दारू आणि ड्रग्जचा व्यसनी आहे. एवढेच नाही तर हनी सिंगने आपल्या एंगेजमेंटची अंगठी घातली नव्हती आणि लग्नाचे फोटो ऑनलाईन पोस्ट केले म्हणून हनी सिंह आपल्याला मारायचाही.

अहवालांनुसार, शालिनीने आपल्याला प्राण्यांसारखी वागणूक दिली असे सांगत, या प्रकरणात 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. तसेच हनीसिंगला आपल्याला दिल्लीतील घराच्या भाड्यासाठी दरमहा पाच लाखांचा धनादेश देण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. हनी सिंग आणि शालिनी तलवार यांनी 20 वर्षांच्या मैत्रीनंतर लग्न केले होते. दोघांचे 2011 मध्ये लग्न झाले. या दोघांच्या लग्नाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या दरम्यान, हनी सिंगचे नाव डायना उप्पलसोबतही जोडले गेले होते, परंतु त्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम झाला नाही. (हेही वाचा: Yo Yo Honey Singh च्या विरुद्ध पत्नीने दाखल केला घरगुती हिंसाचाराचा गुन्हा; पतीवर मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप)

दरम्यान, हनी सिंग या प्रकरणात चांगलाच अडकत असल्याचे दिसत आहे. याचा फक्त त्याच्या कारकीर्दीवरच फार मोठा परिणाम होणार नाही तर, तर त्याची इतक्या वर्षांमध्ये निर्माण झालेली प्रतिमा देखील डागाळली जाईल. या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते याबाबत उत्सुकता आहे.