Rajkot Horror: पत्नीला पॉर्न वेबसाइटवर सेक्स करण्यासाठी पतीकडून जबरदस्ती; सासऱ्याने कॉल गर्ल्सना बोलावून दाखवला Sex करण्याचा डेमो, गुन्हा दाखल
प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

गुजरातमधील राजकोटमध्ये (Rajkot) नातेसंबंधांना काळीमा फासणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शहरातील एका प्रतिष्ठीत हॉटेलच्या मालकाने पैशाच्या लालसेपोटी आपल्या सुनेवर पॉर्न साइटसाठी (Porn Site) व्हिडिओ बनवण्याची जबरदस्ती केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विवाहितेचा पती, सासरा आणि सासूला अटक केली आहे.

राजकोट पोलिसांनी सिटी सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी 356 डी, आयटी कायदा अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. सायबर क्राईम पोलिसांनी सुनेच्या खोलीत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे, सेक्स टॉय आणि काही कपडे जप्त केले आहेत. सुनेचे व्हिडीओ वेबसाईटवर पोहोचल्यावर त्या बदल्यात टोकन मिळाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हे पैसे नंतर भारतीय रुपयात रूपांतरित झाले. काही व्यवहार क्रिप्टोकरन्सीद्वारेही झाले आहेत.

ही घटना राजकोटच्या भक्ती नगरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाशी संबंधित आहे. हे कुटुंब श्रीमंत असूनही त्यांनी आपल्या सुनेच्या सेक्स व्हिडिओजचा लिलाव केला. या 21 वर्षीय विवाहितेने लैंगिक शोषण, लैंगिक छळाची तक्रार केली, त्यानुसार आरोपी पती, सासरा आणि सासू तिला एका विशिष्ट वेबसाइटवर लाईव्ह सेक्स करण्यास भाग पाडत होते. सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

एसीपी सायबर क्राईम विशाल रबारी यांनी सांगितले की, हे कुटुंब खूप समृद्ध आहे. तरी त्यांनी अधिक पैशांसाठी सुनेला एका वेबसाईटवर लाईव्ह सेक्स दाखवण्यास भाग पाडले. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. महत्वाचे म्हणजे विवाहितेने सासरच्या मंडळींवर आरोप केला आहे की, एखाद्या साईटसाठी सेक्स कसा करायचा याची माहितीही तिला कुटुंबाकडून देण्यात आली होती. इतकेच नाही तर तिला एका हॉटेलमध्ये नेण्यात आले, जिथे परदेशी तरुणींसोबत शरीरसंबंध ठेवण्याचे डेमो दिले गेले.