Amol Palekar Health: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती
Amol Palekar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) दाखल करण्यात आले आहे. आता मात्र त्यांची प्रकृती सुधारत आहे. ते लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. एबीपी न्यूजच्या दिलेल्या माहितीनुसार, अमोल पालेकर यांची पत्नी संध्या गोखले (Sandhya Gokhale) यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी ते रुग्णालयात असल्याच्या बातमीला दुजोरा दिला. मात्र, आता काळजी करण्यासारखे काही नाही. त्यांच्या पत्नीला विचारले असता, त्यांनी सांगितले की, दीर्घ आजारामुळे त्यानां रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिधुम्रपानामुळे काही वर्षांपूर्वी त्यांची तब्येतही खालावली होती, असेही त्यांनी सांगितले. आता मात्र त्यांची प्रकृती सुधारत आहे. यापेक्षा अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

अमोल पालेकर यांचे व्यावसायिक जीवन

अभिनेता असण्यासोबतच ते दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. अमोल पालेकर यांनी ललित कला शाखेत पदवी घेतली आणि चित्रकार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांनी आपल्या चित्रांची अनेक प्रदर्शनेही ठेवली होती आणि अनेक शोमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. पण त्यानंतर त्याने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यांनी रंगभूमीवर अप्रतिम काम केले आहे. अमोल पालेकर यांनी हिंदी, मराठी व्यतिरिक्त बंगाली, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. यानंतर अमोल पालेकर यांनी 1986 नंतर अभिनय सोडून चित्रपट निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. (हे ही वाचा Lata Mangeshkar यांच्या स्मरणार्थ मुंबईत उभारलं जाणार आंतराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय)

अमोल पालेकर यांनी कच्ची धूप, नकाब, कृष्ण कली सारखे उत्तम टीव्ही शो केले आहेत. यानंतर, 1994 मध्ये अमोल पालेकर यांनी 'तीसरा कौन' या चित्रपटात काम केले आणि त्यानंतर 2001 मध्ये रिलीज झालेल्या 'अक्स' या चित्रपटात शेवटचे ते दिसुन आले. अमोल पालेकर यांनी 2021 मध्ये 200- Halla हो मध्ये दिसले होते जो Zee5 या ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे अमोल पालेकर यांंनी ओटीटीमध्ये पदार्पण केले. त्याच वेळी, दिग्दर्शक म्हणून त्यांनी 2011 साली प्रदर्शित झालेला शेवटचा मराठी चित्रपट बनवला. या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.