Lata Mangeshkar  यांच्या स्मरणार्थ मुंबईत उभारलं जाणार आंतराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय
Lata Mangeshkar (Photo credits: Wikimedia Commons/ Bollywood Hungama)

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे काही दिवसांपूर्वी मुंबई मध्ये निधन झाले आहे. भारताची गानकोकिळा अशी ओळख असलेल्या या गानसम्राज्ञीला श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्र सरकार आंतराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय उभारलं जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी याची माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय सुरु करण्याचं ठरवलं होतं पण आता त्याला भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय असं नाव दिलं जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.

संगीत महाविद्यालयासाठी मुंबई विद्यापीठामध्ये जागा द्यावी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात होते. त्यानुसार कलिना कॅम्पससमोर 3 एकर जागेत हे संगीत महाविद्यालय उभारलं जाणार आहे. उदय सामंत यांनी मंगेशकर कुटुंबाची भेट घेतली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे. हे देखील नक्की वाचा: lata Mangeshkar Funeral: लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मराठी कलाकार गैरहजर? हेमांगी कवीने पोस्ट शेअर करत दिले उत्तर.

उदय सामंत ट्वीट

दरम्यान लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क वर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर भाजपा आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्कवर त्यांचं स्मृतिस्थळ उभारावं असं म्हणाले होते पण सरकारने आता हे स्मृतिस्थळ संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून कलिना कॅम्पस असल्याचं म्हटलं आहे.