Tiger Shroff's Song Unbelievable Out: टायगर श्रॉफ चे नवे गाणे 'अनबिलीवेबल' अखेर झाले प्रदर्शित, आवाज ऐकून व्हाल मंत्रमुग्ध
Tiger Shroff Unbelievable Song (Photo Credits: YouTube)

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या आवाजातील त्याचे पहिले वहिले गाणे कधी प्रदर्शित होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. त्याचे हे गाणे आज अखेर प्रदर्शित झाले आहे. 'Unbelievable' असे या गाण्याचे नाव असून सोशल मिडियावर (Social Media) हे गाणे व्हायरल होत आहे. डान्समध्ये हातखंडा असलेल्या टायगरचा अद्भूत नृत्याविष्कार आणि सुरेल आवाज असलेल्या या गाण्याचा व्हिडिओ चाहते पसंत करत आहे. हे गाणे प्रदर्शित होताच अगदी काही वेळात 3 लाखांहून अधिक लोकांना हा व्हिडिओ पाहिला आहे. काही दिवसांपूर्वी टायगरने या गाण्याचा टीजर देखील प्रदर्शित केला होता. तो टीजरही प्रचंड व्हायरल झाला होता.

बिग बँग म्युजिक (Big Bang Music) प्रस्तुत हे गाणे आता युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये टायगर हातात माइक घेऊन रॉकस्टार अंदाजात गाणे गाताना दिसत आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये टायगरला एक मुलगी आवडते. तिच्या आठवणीत तो हे गाणे गाताना दिसत आहे. Tiger Shroff च्या पहिले वहिले गाणे Unbelievable चा टीजर आला समोर, 'या' दिवशी येणार चाहत्यांच्या भेटीला

या रोमँटिक गाण्याला टायगरने तितकेच रोमँटिक अंदाजात गायिले आहे. शिवाय यात त्याचा डान्स पाहून तरुणी घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही असाच आहे. डीजी मायने आणि अवितोश यांनी हे गाणे लिहिले आहे. पुनीत मल्होत्रा आणि परेश यांनी मिळून हे गाणे दिग्दर्शित केले आहे.

टायगर श्रॉफ याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, लवकरच तो आपल्याला 'हिरोपंती 2' या चित्रपटात दिसेल. लॉकडाऊन आधी प्रदर्शित झालेला त्याचा 'बागी 3' हा सिनेमा लॉकडाऊन मुळे चांगली कमाई करु शकला नाही.